शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

नाथागोळेत चव्हाण यांच्या विरोधात कोण लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:21 AM

विद्यमान नगरसेविका - जयश्री सचिन चव्हाण सध्याचे आरक्षण - सर्वसाधारण महिला लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकीकडे दाटीवाटीने वसलेली ...

विद्यमान नगरसेविका - जयश्री सचिन चव्हाण

सध्याचे आरक्षण - सर्वसाधारण महिला

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : एकीकडे दाटीवाटीने वसलेली झोपडपट्टी, दुसरीकडे पूर्वनियोजित उभारण्यात आलेली टिंबर मार्केट वसाहत आणि नंतर गल्ली संस्कृती अशा संमिश्र रचनेच्या प्रभाग क्रमांक ५७ - नाथागोळे तालीम या प्रभागात फारशी चूरस असल्याचे पाहायला मिळत नाही. गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे यावेळची निवडणूकदेखील एकतर्फी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रभागात नगरसेविका जयश्री सचिन चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांचा गेल्या पन्नास पच्चावन्न वर्षांचा प्रभागाशी असलेला घरोबा आणि प्रत्येक मतदारांशी असलेले वैयक्तिक सबंध ही खूप मोठी जमेची बाजू चव्हाण यांच्या पाठीशी आहे आणि त्याची प्रचीती प्रत्येक निवडणुकीतून आलेली आहे. त्यामुळे चव्हाण कुटुंबियांविरोधात कोण लढणार, हाच प्रत्येक निवडणुकीतील चर्चेचा विषय असतो. याही वेळी हाच विषय चर्चेत आहे.

गतवेळी प्रभागावर सर्वसाधारण आरक्षण असूनही काँग्रेसकडून जयश्री चव्हाण यांनी निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात महाडिक समर्थक माजी नगरसेवक कै. प्रकाश मोहिते यांनी दंड थोपटले. मोहिते यांचा प्रभागात चांगला संपर्क असूनही त्यांना जयश्री चव्हाण यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. बाकीच्या सर्वच उमेदवारांची अनामत जप्त झाली. पांडुरंग आडसुळे गंजीमाळमधील असूनही त्यांना कशीबशी १३२ मते मिळाली. त्यामुळे चव्हाण कुटुंबियांचा प्रभावर असलेला करिष्मा या निवडणुकीत स्पष्ट झाला.

प्रभागातील वातावरण फार काही बदललेले नाही. विद्यमान नगरसेवकांबद्दल प्रत्येक प्रभागात नाराजी दिसून येते, परंतु नाथागोळे प्रभागात अशी नाराजी दिसत नाही. उलट गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे त्यांची बाजू अधिक मजबूत असल्याचे दिसून येते. कोरोनाच्या काळात या प्रभागाला जबरदस्त फटका बसला, तेव्हा चव्हाण परिवाराने केलेली मदत प्रत्येक कुटुंबाला मोलाची ठरली. प्रत्येक घरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, औषधांचे डोस पोहोच झाले. त्यामुळे चव्हाण यांना सहानुभूती आहे.

जयश्री चव्हाण पुन्हा येथून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या विरोधात प्रकाश मोहिते यांच्या पत्नी माजी नगरसेविका यशोदा मोहिते उभ्या राहतील अशी शक्यता होती; परंतु त्यांनी पुढील धोका ओळखून संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस गिरीश साळोखे यांनी पत्नी निलांबरी साळोखे, तसेच विजय अगरवाल यांनी त्यांच्या पत्नीसाठी भाजपकडे तिकीट मागितले आहे. गिरीश यांनी पूर्वीपासून तयारी केली आहे. कोरोनाच्या काळात भाजपने दिलेली मदत घराघरात पोहोचवून स्वत:ही पाेहोचण्याचा प्रयत्न केला आहे. सहा सात वर्षे पक्षीय कामात ते अग्रेसर आहेत. राष्ट्रवादीकडून गतवेळचे उमेदवार युवराज साळोखे त्यांच्या पत्नी स्नेहल यांना उभे करणार आहेत. प्रशांत जगदाळे, अमर जरग, राहुल दुकांडे यांनी त्यांच्या पत्नीसाठी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे. याशिवाय फिरंगाई तालीम परिसरातील रूपेश पाटील आपल्या आईंना निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत.

प्रभागात झालेली कामे -

- गंजीमाळ परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविला, घराघरात पाण्याचे कनेक्शन दिले.

- गंजीमाळ येथील नव्वद घरात शेल्टर व चव्हाण युवामंचतर्फे ९० घरांत शौचालये बांधून दिली.

- रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम सुरू. महिला बचत गटांसाठी देणार.

- प्रभागात सर्वच रस्ते, गटार, ड्रेनेज लाइनचा प्रश्न सोडविला.

- टिंबर मार्केट येथे मॉडेल रस्त्याचे काम, वृक्षलागवड, अंडरग्राऊंड गटारी, लाइट कनेक्शन दिले.

- कामगार चाळ सुशोभीकरण

शिल्लक असलेली कामे -

- गवत मंडई येथील १०६ कुटुंबांना त्यांची राहती घरे नावावर करून अंतिम टप्प्यात.

- रत्नाप्पा कुंभार हॉलचे डागडुजीचे काम प्रगतिपथावर.

- स्वखर्चातून सत्यप्रकाश सेवा मंडळाची इमारत बांधकाम.

- द्वारकानाथ कपूर विद्यालयाच्या वरील माळ्यावर हॉल बांधकाम प्रक्रिया सुरू.

-

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते -

- जयश्री सचिन चव्हाण - काँग्रेस - २००५

- प्रकाश महादेव मोहिते - ताराराणी आघाडी - १०८१

- युवराज बाजीराव साळोखे - राष्ट्रवादी - २६०

- पांडुरंग ज्योती आडसुळे - अपक्ष - १३२

- संजयकुमार बावडेकर - शिवसेना - १०४

- गिरीश गजानन साळोखे - एसफोर ए - ३५

- प्रवीण विठ्ठल देसाई - अपक्ष - १७

कोट -

प्रभागात गेल्या पाच वर्षांत साडेचार कोटींची कामे केली आहेत. दैनंदिन कचरा उठाव, पिण्याच्या मुबलक पाण्यासह जवळपास नव्वद टक्के समस्या सोडविल्या आहेत. येत्या काही महिन्यांत सुरू असलेली कामेदेखील पूर्ण होतील.

जयश्री चव्हाण, नगरसेविका