शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

‘आजरा’च्या पाठीशी संपूर्ण ताकद

By admin | Published: May 19, 2016 12:39 AM

चंद्रकांतदादा यांची ग्वाही : आजरा येथे महाआघाडीची प्रचारसभा

आजरा : स्व. वसंतराव देसाई यांनी मोठ्या कष्टातून आजरा साखर कारखान्याची उभारणी केली आहे. सहकारात अनिष्ठ प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. काही नेतेमंडळी अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहेत, ही बाब गंभीर असल्याने आजरा साखर कारखान्यातून अशा प्रवृत्तींना बाहेर काढण्यासाठी स्व. वसंतराव देसाई महाआघाडीच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी राहणार आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आजरा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्व. वसंतराव देसाई महाआघाडीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत सहकारमंत्री पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे होते. प्रास्ताविकपर भाषणात विष्णुपंत केसरकर म्हणाले, विरोधी आघाडीकडून आकसापोटी साखर वाटप व एफ.आर.पी. शिल्लक हप्त्याबाबत आपण विरोध केला, असे आरोप करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. साखर कारखाना निवडणुकीत परिवर्तनाची लाट तयार झाल्याने असे बेछूट आरोप केले जात आहेत. सहकारमंत्री पाटील म्हणाले, कारखाना सक्षमपणे चालून सभासदांना चांगला दर देण्यासाठी आता कारखाना विस्तारीकरणाबरोबर सहवीज व डिस्टीलरी प्रकल्प सुरू करणे गरजेचे असून, यासाठी सहकारमंत्री म्हणून आपण सरकारदरबारी प्रयत्न करू. आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, आजरा साखर कारखान्यात परिवर्तन होणार हे सांगण्यासाठी आता ज्योतिषाची गरज राहिली नाही. सभासदांनी महाआघाडीला दिलेला प्रतिसाद पाहता विरोधक या वादळात निश्चित भुईसपाट होतील. माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, श्रीमती रेडेकर-शिंपी व कथित नेतेमंडळींची अभद्र युती या निवडणुकीत झाली आहे. अशावेळी अशा मंडळींना कारखान्यातून हाकलून घालवण्यासाठी महाडिक उद्योगसमूह महाआघाडीच्या पाठीशी आहे. ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत म्हणाले, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची ही निवडणूक आहे. अशावेळी सत्ताधाऱ्यांना पैशाची मस्ती आली आहे. ती मस्ती उतरवण्याची गरज आहे. अशोकअण्णा चराटी म्हणाले, माझा आणि आजरा कारखान्याचा संबंध काय म्हणणाऱ्या मंडळींनी भरमूअण्णा पाटील यांनी मंत्री असताना आपल्या प्रयत्नातून तीन कोटी रुपयांचे भागभांडवल मिळवून दिले हे विसरू नये. माजी आमदार के. पी. पाटील यांचा तरी बिद्री कारखान्याशी काय संबंध आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. खासगी साखर कारखाना चालविणाऱ्यांनी सहकारावर बोलू नये, असा टोलाही मुश्रीफ यांना लगावला. सभेस माजी आमदार संजय घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, आ. सुरेश हाळवणकर, राजेंद्र गड्ड्यानवार, हिंदुराव शेळके, बाबा देसाई, बाळासाहेब कुपेकर, सरपंच शीला सावंत, अन्नपूर्णादेवी चराटी, बाबूराव कुंभार, संभाजी पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)आजरा येथे स्व. वसंतराव देसाई आघाडीच्या प्रचारसभेत बोलताना सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील. यावेळी माजी नगरसेवक आर. डी. पाटील, पुंडलिक जाधव व आघाडीचे अन्य मान्यवर नेते उपस्थित होते.