शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

घाऊक बाजारातील किरकोळ विक्री बंद

By admin | Published: September 30, 2015 12:28 AM

बाजार समिती : व्यापाऱ्यांना दिलासा--लोकमतचा दणका

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारातील किरकोळ विक्री अखेर मंगळवारपासून बंद करण्यात आली. गेली अनेक वर्षे पणन कायदा धाब्यावर बसवून ही विक्री सुरू होती. समिती संचालक मंडळाने संबंधित व्यापाऱ्यांना आदेश काढून किरकोळ विक्री बंद करण्यास सांगितल्याने मिनी मार्केटमधील किरकोळ व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बाजार समितीने १९९३ ला गाळे बांधून भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याचे मिनी मार्केट तयार केले. त्यामध्ये ७२ गाळे आहेत. समितीत होणाऱ्या लिलावात माल घेऊन त्याची किरकोळ विक्री करावी, या उद्देशाने मिनी मार्केट उभे राहिले. सुरुवातीला हे मार्केट चांगले चालले; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून घाऊक भाजीपाला मार्केटमध्येच किरकोळ विक्री सुरू केली आणि मिनी मार्केटमधील व्यवसायच संपला. घाऊक बाजारात माल घ्यायचा आणि तिथेच त्याची विक्री करण्याचे काम ३२ व्यापारी करीत आहेत. याबाबत मिनी मार्केटमधील व्यापारी समितीकडे तक्रार करीत होते. समितीने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने किरकोळ व्यापारी हवालदिल झाले होते. याबद्दल ‘न्यायालयीन आदेशाची बाजार समितीत पायमल्ली’ या मथळ्याखाली २६ आॅगस्टला ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. त्यानंतर समितीची यंत्रणा खडबडून जागी झाली. त्याची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी समितीकडे खुलासा मागितल्याने या प्रकरणाने गती घेतली.गेली चार वर्षे आम्ही याबाबत प्रशासनाकडे दाद मागत होतो. ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यामुळे तेथील किरकोळ विक्री बंद झाली. तिथे किरकोळ विक्री करणारे आमचेच बांधव आहेत. त्यांनी मिनी मार्केटमध्ये येऊन व्यवसाय करावा. त्यास आमची हरकत नाही. - यशोदा पाटील, किरकोळ व्यापारी, मिनी मार्केट