‘कोजिमाशि’ पतसंस्थेचा प्रगतीचा वाढता आलेख सभासदांना माहिती आहे. सत्तारूढ गटातून निवडून आले आणि सभापती पद मिळाले नाही, म्हणून चांगल्या चाललेल्या संस्थेची बदनामी करण्याचा उद्योग काहींचा सुरू आहे. आपण शिक्षक आहोत, एखाद्या संस्थेवर चिखलफेक करताना अभ्यास करणे अपेक्षित आहे. केवळ व्यक्तिव्देषातून आरोप करणाऱ्यांची सभासदांमध्ये काय प्रतिमा आहे, हे येत्या निवडणुकीत समजेल. संस्थेने मागील चार वर्षांत संस्था ठरावाप्रमाणेच व घटनेनुसारच लेखापरीक्षक नियुक्ती, सॉफ्टवेअर ए. एम. सी, दीपावली भेटची प्रक्रिया राबवली आहे. हे सगळे चुकीचे होते; मग पहिल्या चार वर्षांत विरोध का केला नाही. आकस्मिक कर्ज एक लाख व व्याजदर १० टक्के, असे सभासद हिताचे निर्णय घेतले, त्यालाही व्देषापोटी विरोध करत असल्याचे अध्यक्ष सुतार, उपाध्यक्ष सुभाष पाटील, संचालक बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे, प्रा. एच. आर. पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
स्तुती करणाऱ्यांना आताच मिरच्या का झोंबल्या - कैलास सुतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:19 AM