कळे: अवैद्य व्यवसायावर सातत्याने एकट्यावर कारवाई करत असल्याची ओरड करत कळे पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारा दिव्यांग बुकी चालक सचिन विनायक खवळ (रा. काऊरवाडी ता. पन्हाळा) याच्यावर गुन्हा नोंद झाला. कॉन्स्टेबल सुनिल खाडे यांनी फिर्याद दिली. काल, शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.बुकी चालक बाबासाहेब काळे (रा. सावर्डे) यांच्याकडे सचिन हा मटक्याच्या टिपण्या घ्यायला होता. आदल्या दिवशी छापा पडला. त्याच्यावर कारवाई झाली. दुसऱ्या दिवशी लगेच मटका मालक नामदेव पोवारने सचिनला इथून पुढे तू कामावर येऊ नकोस असे सांगितले.''सगळ्या बुकी चालू आहेत मग माझी एकटयाचीच बंद का? पोलिसांनी मटका मालकाला सांगायला नको का? दुसऱ्या एजंटांचं ऐकून पोलीस मला एकट्यालाच का टार्गेट करतात? '' अशी विचारणा करत दिव्यांग बुकी चालक सचिन विनायक खवळे (रा.काऊरवाडी, ता.पन्हाळा) याने कळे पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.शासकीय कर्तव्य बजावण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने पोलिस ठाणे परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकारानंतर पोलिसांचीही भंबेरी उडाली. दरम्यान यावेळी नेत्यांचे कार्यकर्ते व मटका व्यावसायिकांची गर्दी केली.
Kolhapur: माझी एकटयाचीच बुकी बंद का? बुकी चालकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:34 IST