शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

संधी द्या, आंबेओहोळ पुनर्वसन मार्गी लावू; समरजीत घाटगेंनी दिली ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 18:03 IST

पालकमंत्र्यांनी २७ बैठका घेतल्या, तरीही प्रश्न प्रलंबित

उत्तूर : चित्रकार बाबासाहेब कुपेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आंबेओहोळ प्रकल्पाकडे पाहिले जाते. त्यांच्या पश्चात निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पासाठी २२७.५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे भाग्य मला लाभले. गेल्या पाच वर्षांपासून या धरणामध्ये पाणी साठवले जात आहे. मात्र, पालकमंत्र्यांनी २७ बैठका घेऊनही या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित का आहेत? असा खडा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीत घाटगे यांनी उपस्थित केला. आमदारकीची एक संधी द्या, पहिल्याच बैठकीत हा प्रश्न मार्गी लावतो, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. होन्याळी (ता. आजरा) येथे आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच स्मिता पाटील होत्या. घाटगे पुढे म्हणाले, प्रकल्पाच्या पूर्णत्वातून कुपेकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी होती. मात्र, पंचवीस वर्षे आमदार, मंत्री विशेषत: जलसंपदा खात्याचे मंत्री असतानाही त्यांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे दुर्लक्ष केले. तालुक्यातील विकासकामांप्रमाणे पुनर्वसनाच्या प्रश्नातही त्यांचे ठेकेदार या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून त्यांची फसवणूक करत आहेत.उद्धवसेनेचे भिकाजी मोरबाळे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करतील.आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीश्रमिक मुक्ती दलाचे नेते संपत देसाई म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे गतवेळी आम्ही पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला. मात्र, त्यांनी उत्तूर विभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. विशेषतः आंबेओहोळसारख्या प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मंत्री असूनही त्यांना सोडविता आला नाही. ही धमक छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगे यांच्याकडे आहे. यावेळी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असून, त्यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यावेळी एस. एस. पाटील, उपसरपंच तानाजी गुरव, सचिन उंचावळे, संगीता देऊस्कर,जयश्री जाधव,शंकर कांबळे, संजय कांबळे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024