प्रा. एस. ए. पाटील यांना वडील अण्णासोा पाटील यांच्याकडून समाजसेवेचा वारसा मिळाला होता. २७ वर्षांच्या सेवेनंतर ते उपप्राचार्य पदावरून २०१४ मध्ये निवृत्त झाले होते.
पंधरा दिवसांपूर्वी त्यांचा व त्यांच्या पत्नी शकुंतला पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
या दोघांनाही कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र पत्नींच्या तब्येतीत बिघाड होत असल्याने ते चिंतातुर होते. त्यामुळे त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने सोमवारी सायंकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले. तर त्यांच्या पाठोपाठ दोन तासाने त्यांच्या पत्नी शकुंतला यांचे निधन झाले. प्रा. विशाल पाटील यांचे ते वडील होत.