ठळक मुद्देपत्नीने उकळलेला चहा फेकला पतीच्या तोंडावरपत्नीवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
इचलकरंजी : इंदिरानगर येथील किरकोळ कारणावरून पत्नीने उकळलेला चहा पतीच्या तोंडावर फेकल्याने तो किरकोळ जखमी झाला. सुबहान बादशहा फनीबंद (वय ४५) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी पत्नी आस्मा (३५) हिच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सुबहान यांनी शनिवारी (दि.३) आस्मा हिला दारात उभी राहू नकोस. आत बस, असे म्हणताच त्या दोघांत वाद झाला.
त्यावेळी चिडून आस्मा हिने गॅसवर उकळत ठेवलेला चहा सुबहान यांच्या तोंडावर फेकला. त्यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर रविवारी सुबहा यांनी पोलिसांत पत्नीविरोधात तक्रार दिली.