हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नवीन प्रशासकीय इमारत कार्यालयामध्ये होणार आहे, अशी माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण प्रवर्ग मध्ये = ६ व स्त्री= ६, अनुसूचित जमाती प्रवर्गमध्ये सर्वसाधारण - o, तर स्त्रियांसाठी = १, नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये सर्वसाधारण प्रवर्गसाठी = ८, तर स्त्री = ८, तर सर्वसाधारण प्रवर्गसाठी = १६, तर स्त्री = १५ अशा एकूण ६० ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. ऑक्टोबर २०२२ ला होणाऱ्या ४२ गावांच्या सरपंचपदाचे आरक्षण २७ जानेवारी रोजीच निश्चित होणार आहे. यामुळे २०२२ चा सरपंच कोण, हे गावकऱ्यांना दोन वर्षे अगोदर समजणार असल्याने, शासनाकडून निवडणुकीअगोदर सरपंच आरक्षण होणार नसल्याचा निर्णय यामुळे बासनात गुंडाळला जाणार आहे.