लोकसभेच्या सध्या चर्चा सुरु आहेत. कोल्हापूरमधील 2 पैकी 1 जागा लढवावी, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. चार राज्यातल्या विधानसभांसोबत लोकसभा घ्यायची, अशी चर्चा आहे. महिनाभरात चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
प्रत्येक पक्षाला वाटते आम्हाला जागा मिळावी. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. ज्यांच्या जसे वाटणीला येईल तसे पुढे निर्णय होतील, असे ते म्हणाले. आशिष देशमुखांनी केलेली जाहीरपणे पक्षाची बदनामी पटणारी नव्हती. पक्ष म्हणून शिस्त असणे गरजेचे आहे, असे पाटील म्हणाले.
काँग्रेसचे मुख्यमंत्री ज्या ज्या राज्यात आहेत ते त्यांच्या त्यांच्या राज्यात जाऊन सिद्धरामय्यांची कामे सांगत असतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रातल्या राजकारणात होईल असे वाटते, असे पाटील म्हणाले.
राजू शेट्टी यांच्यासोबत जाण्याची अद्याप काही चर्चा झालेली नाहीय. एका कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली आहे. पण निवडणुकीबाबत काहीही चर्चा नाही. संजय मंडलिक मला विविध कार्यक्रमांमध्ये भेटतात, त्या ठिकाणी कुठलीही राजकीय चर्चा होत नाही किंवा झालेली नाही, असे सतेज पाटील म्हणाले. इतिहासाच्या पानात जाण्यात अर्थ नाही आता भविष्यात काय? हे पाहायला पाहिजे, असा सल्लाही पाटलांनी दिला.