शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

आघाड्यांचे भूत कोल्हापूरच्या मानगुटीवर पुन्हा बसणार काय..?

By admin | Published: October 10, 2015 12:24 AM

मतदारांचीच कसोटी : काँग्रेसला रोखण्यासाठी ‘ताराराणी’ मैदानात

विश्वास पाटील - कोल्हापूर--महापालिकेच्या राजकारणातील काँग्रेसच्या वर्चस्वाला मोडून काढण्यासाठी ताराराणी आघाडी मैदानात उतरली आणि आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाचा उदय झाला. आता पुन्हा तोच अजेंडा घेऊन महाडिक यांच्या छुप्या नेतृत्वाखालील ही आघाडी या निवडणुकीत मैदानात उतरली आहे. सत्ता हेच मुख्य साध्य असलेल्या या आघाडींचे भूत कोल्हापूरची जनता मानगुटीवर बसू देणार काय, हीच खरी उत्कंठा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधीही पक्षीय सत्ता असेल, तर काही प्रमाणात तरी कारभारावर वचक राहतो. केंद्र व राज्य शासनाकडून निधी आणता येतो. गेल्या पाच वर्षांत पक्षीय राजकारणामुळे हजार-बाराशे कोटी रुपये आले व घोडेबाजार झाला नाही. महाडिक यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी भूखंड लाटले नाहीत की कोणत्या टेंडरमध्ये रस दाखविला नाही, हे खरे असले तरी पदाधिकारी निवडून द्यायचे आणि तिथे काय चालते याकडे मात्र काडीचे लक्ष द्यायचे नाही, असा त्यांचा व्यवहार राहिला. त्यांच्याकडे एकहाती सत्ता होती. त्यावेळी या शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची त्यांना संधी होती; परंतु तसे काहीच झाले नाही. फक्त व्यक्तिगत वर्चस्वाच्या राजकारणातच ते अडकून पडले. त्यातून ते आजही बाहेर आलेले नाहीत. आताही त्यांची ताराराणी आघाडी म्हणजे महाडिक गटाचे राजकारण पुन्हा प्रस्थापित करण्याचाच प्रयत्न आहे. लोकांचे प्रश्न, विकासाचे राजकारण असले काही विषय त्यांच्या खिजगणतीत नाहीत.कोल्हापूरच्या नगरपालिकेची महापालिका करण्याचे श्रेय दिवंगत नेते श्रीपतरावदादा बोंद्रे यांना जाते. त्यामुळे महापालिकेत सुरुवातीची पाच ते सहा वर्षे त्यांचा वचक राहिला. पुढे तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नेतृत्व मानणारा गट सत्तेत आला. दादा-साहेबांचे दरबारी राजकारण मोडून काढण्यासाठी महादेवराव महाडिक, व्ही. बी. पाटील, पत्रकार बी. आर. पाटील, पापा कौलवकर यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले. पुढे एका टप्प्यावर त्यातील महाडिक वगळता अन्य बाजूला झाले व काँग्रेसमधील राजकारणाची सोयरिक म्हणून त्यात पी. एन. पाटील, अरुण नरके यांचा समावेश झाला. किमान दहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक-नरके-पाटील या ‘मनपा’ लॉबीचे वर्चस्व राहिले. महाडिक महापालिकेत सत्ताधारी, पी.एन. हे सलग पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले व इकडे ‘गोकुळ’मध्ये अरुण नरके सलग दहा वर्षे अध्यक्ष झाले. पुढे सांगरूळ मतदारसंघात महाडिक यांनी उघड पाठिंबा देऊन आतून धोका दिल्याचा अनुभव आल्यावर पी. एन. व महाडिक यांच्यात वैमनस्य आले. तत्पूर्वी १९९० च्या सुमारास ताराराणी आघाडीचा जन्म झाला; परंतु ही आघाडी निवडणुकीनंतर अस्तित्वात येई. प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून येत. त्यांना एकत्र करण्याचे काम महाडिक करीत असत. सुरुवातीच्या टप्प्यात या आघाडीने सामान्य कार्यकर्त्याला सत्तेची संधी दिली. शिवाजी पेठेतील सरदार तालीम प्रभागातून गाजलेल्या लढतीत शिवाजीराव चव्हाण यांचा पराभव करून भिकशेट पाटील विजयी झाले व महाडिक यांनी त्यांना १९९० ला महापौर केले. त्यामुळे महाडिक यांची चांगलीच ‘क्रेझ’ तयार झाली. पुढे पाच-सहा वर्षे महाडिक म्हणतील ती पूर्व दिशा राहिली. त्यास १९९८ ला महापौर निवडीत सुरूंग लागला. ताराराणी आघाडीच्या माया भंडारे यांचा पराभव करून त्यावेळी कांचन कवाळे महापौर झाल्या. पुढील वर्षी नंदकुमार वळंजू यांचा पराभव करून बाबू फरास महापौर झाले. ‘बिन आवाजाच्या बॉम्ब’ची हवा निर्माण झाली. त्यावेळी महाडिक दोन पाऊल मागे सरकले; परंतु त्यांचे वर्चस्व कायमच राहिले. त्यांना पुन्हा २००५ च्या निवडणुकीत विनय कोरे-हसन मुश्रीफ यांनी आव्हान दिले. या निवडणुकीत काँग्रेस चिन्हावर लढली नव्हती. ‘घोडेबाजार नको..’ म्हणून आम्हाला मते द्या, असे सांगणाऱ्या कोरे यांना निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही; परंतु त्यांनीच मोठा घोडेबाजार करून महाडिक यांच्या सत्तेला सुरूंग लावला व सई खराडे या ‘जनसुराज्य’च्या उमेदवार म्हणून २००५ ला महापौर झाल्या. आघाड्यांचे राजकारण संपवून पक्षीय राजकारणाचा खऱ्या अर्थाने उदय गत निवडणुकीत झाला. त्यामागेही महाडिक यांच्या राजकारणाला शह देण्याचाच प्रयत्न होता. गेल्या पाच वर्षांत आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील व विनय कोरे यांचा वरचष्मा राहिला. काँग्रेसच्या राजकारणात सतेज पाटील यांनी महाडिक यांना महत्त्व दिले नाही म्हणून ते दुखावले गेले. आता महापालिका निवडणुकीत ते बाजूला जाण्याचे तेच कारण आहे. आता काँग्रेसपेक्षा सतेज पाटील यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी ते ‘ताराराणी’ची ढाल करून मैदानात उतरले आहेत. सोबतीला भाजपला घेतले आहे. (समाप्त)एकमेव विजयगतनिवडणुकीत शाहू आघाडीच्या यशोदा मोहिते या गंजीमाळ प्रभागातून विजयी झाल्या. त्यांना १३०३ मते मिळाली. मोहिते या माजी नगरसेवक प्रकाश मोहिते यांच्या पत्नी होत. हे मोहिते आमदार महाडिक यांचे निष्ठावंत. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांच्या आग्रहामुळे सचिन चव्हाण यांच्या पत्नीस मिळाल्याने मोहिते शाहू आघाडीकडे गेल्या. आता याच सौ. मोहिते भाजपकडून संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून, तर स्वत: मोहिते नाथागोळे प्रभागातून ताराराणी आघाडीकडून रिंगणात आहेत.विक्रमसिंह घाटगे यांची ‘शाहू आघाडी’शाहू आघाडी दहा ठिकाणी दुसऱ्या स्थानांवर होती. त्यामध्ये शुगरमिल, कसबा बावडा, हनुमान तलाव, पोलीस लाईन, राजर्षी शाहू मार्केट यार्ड, शाहूपुरी उत्तर, विक्रमनगर, जवाहरनगर, पांजरपोळ, सागरमाळ या प्रभागांचा समावेश होता. या आघाडीचे शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे हे प्रमुख होते. ही आघाडी महाडिक यांचीच डमी असल्याची टीकाही त्यावेळी सातत्याने झाली. महापालिकेच्या राजकारणात यापूर्वी महालक्ष्मी आघाडी, नगरविकास आघाडी, शहर विकास आघाडी अशाही काही आघाड्या होऊन गेल्या आहेत.