दिगंबर चव्हाण-- यवलूज --माजी मंत्री विनय कोरे यांचे वर्चस्व असलेल्या यवलूज जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने मातब्बरांची गोची झाली आहे. २००७ ला पुनर्रचित मतदारसंघातून सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य जनसुराज्यचा निवडून गेला असल्याने जनसुराज्य पक्ष हॅट्ट्रिक साधण्यास तयार आहे; पण त्याच्यापुढे शिवसेना, काँग्रेस व भाजपचे आव्हान असणार आहे.यवलूज मतदारसंघ हा दोन लोकसभा व दोन विधानसभा यामध्ये विभागला असून, काही गावे करवीर, तर काही गावे पन्हाळा-शाहूवाडी विधानसभेत विभागली आहेत.या मतदारसंघात माजी मंत्री विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे प्राबल्य असून, भाजपही कार्यरत आहे.माजी मंत्री विनय कोरे यांनी भाजपशी संधान बांधले आहे. त्यामुळे या ठिकाणी जनसुराज्य पक्षाचा विद्यमान सदस्य आता असल्याने यवलूज जनसुराज्यकडे राहील अशी चर्चा आहे; पण या ठिकाणी जनसुराज्य उमेदवाराला तिकीट मिळाल्यास भाजप आपला स्वतंत्र उमेदवार उभा करणार, अशा हालचाली येथे दिसून येत आहेत.आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांचे नाव कळे व कोतोली या दोन जि. प. मतदारसंघातून घेतले जाते. अजित नरके कोतोली मतदारसंघातून उतरल्यास यवलूज जिल्हा परिषद मतदारसंघ हा सत्यजित पाटील-सरुडकर यांना नरके सोडतील. यवलूज गणातील सर्व गावे यापूर्वी पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात होती. त्यामुळे मतदारसंघ बदलल्यास त्यांनाही अडचण असणार नाही.एकंदरीत कोरे यांच्या विरोधात सर्वच आजी-माजी पदाधिकारी एकत्रित येऊन मोट बांधून जनसुराज्यचा वारू रोखण्याची तयारी करताना दिसत आहे. तरीसुद्धा जनसुराज्यही ताकदीने उतरणार आहे.गतवेळी शिवसेना-भाजप एकत्र होते. त्यावेळी काँग्रेस व जनसुराज्यचा उमेदवारही रिंगणात होता. यावेळी भाजप-जनसुराज्य एकत्र आहेत; पण नक्की उमेदवार एकच की दोन स्वतंत्र असणार याची चर्चा भागात आहे. यवलूजशिवसेनेची ताकद : जयसिंग पाटील, आनंदराव माने, बाबासो पाटील, जी. आर. पाटील, जयसिंग पाटील (ठाणेकर), जनसुराज्य : बी. आर. पाटील, मधुकर पाटील, प्रा. सुहास राऊत, बाबासो शिंदे, बाळासाहेब पाटील, भरत मोरे, बाजीराव पाटील-रांगडे, मानसिंग पाटील, भाजपची शक्तिस्थळे : के. एस. चौगुले, शिवाजी पाटील, रघुनाथ झेंडे, लक्ष्मण पाटील, काँग्रेसची ताकद : संग्राम पवार, पां. वि. पाटील, राजू बोरगे, संजय निकम, पृथ्वीराज पाटील, सुभाष कुंभार, निवास पाटील. यवलूज जिल्हा परिषदयवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्व पक्षांनी प्राथमिक चर्चा, बैठका घेतल्या असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीस आतापासूनच सुरुवात केली आहे.जिल्हा परिषदेसाठी जनसुराज्य पक्षाकडून पूजा दिलीप पाटील (काठाणे), शालन मधुकर पाटील (सातार्डे), मधुरिमा मानसिंग पाटील (यवलूज), लक्ष्मी केरबा चौगले (माजगाव), संजीवनी भरत मोरे (देवठाणे), राजश्री प्रधान पाटील (उत्रे), रेश्मा बाजीराव पाटील (यवलूज), आदी इच्छुक आहेत.काँग्रेस पक्षाकडून मनीषा शरद मिसाळ (यवलूज), आश्विनी कृष्णात पाटील (माजगाव), आदी इच्छुक आहेत.भाजपकडून कल्पना केरबा चौगले (माळवाडी) व सीमा शिवाजी पाटील (यवलूज) या इच्छुक आहेत.शिवसेनेकडून संगीता पांडुरंग काशीद (यवलूज), प्राचार्या वर्षा युवराज गायकवाड (आळवे), वैशाली सुरेश पोवार (सातार्डे), रेखा राजाराम शिंदे (खोतवाडी), आदींनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.जिल्हा परिषदेला इच्छुक अनेक आहेत; पण पंचायत समितीसाठी सर्वच पक्षांना उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. गतवेळी यवलूज पंचायत गण सर्वसाधारण महिलेसाठी खुला होता. त्यामुळे चुरस झाली. यावेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित केला आहे.
यवलूज येथे जनसुराज्य पक्ष हॅट्ट्रिक साधणार का?
By admin | Published: January 04, 2017 11:51 PM