कोल्हापूर : शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवणार तसेच वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेऊन सेंट्रलाईज साऊंड सिस्टीमचा वापर करणार असल्याची माहिती नूतन शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.प्रेरणा कट्टे यांची पिंपरी-चिंचवडला बदली झाल्यापासून कोल्हापूरचे शहर पोलीस उपअधीक्षकपद हे रिक्त होते. या पदावर बाबूराव महामुनी यांची बदली झाली होती; पण त्यांनी पदभार घेण्यापूर्वीच इचलकरंजी येथे बदली करून घेतली. त्यामुळे गेले दोन महिने हे पद रिक्तच होते. गुरुवारी दुपारी नूतन पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडून पदभार घेत संपूर्ण शहराची माहिती घेतली.उपअधीक्षक चव्हाण हे मूळचे सातारा शहरातील रहिवासी असून त्यांचे शिक्षण अभियांत्रिकीपर्यत झाले आहे. त्यांनी आतापर्यंत नागपूर ग्रामीण, लातूर शहर, अकलूज शहर, मालेगाव या ठिकाणी पोलीस उपअधीक्षकपदाची धुरा सांभाळली आहे.ते म्हणाले, शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रथम पारंपरिक गुंडांच्या टोळ्या व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांचा बीमोड करणार आहे. शहरातील पोलीस ठाण्यांतील मूलभूत अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार पोलीस बंदोबस्तासाठीही घेण्यात येणार आहे. यासाठी वायरलेसची सेंट्रलाईज साऊंड सिस्टीम उभारून त्याद्वारे चौका-चौकांतील बंदोबस्तासाठीच्या पोलिसांना सूचना देणार आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर नजर ठेवणार : मंगेश चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 4:24 PM
PoliceOficer, Cctv, TraficOffice, Kolhapurnews कोल्हापूर शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवणार तसेच वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेऊन सेंट्रलाईज साऊंड सिस्टीमचा वापर करणार असल्याची माहिती नूतन शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.
ठळक मुद्देनुतन शहर पोलीस उपअधीक्षक पदभार स्विकारलावाहतुक नियंत्रणासाठी सेंट्रलाईज साऊंड सिस्टीम अवलंबणार