शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
2
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
3
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
4
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
5
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
6
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
7
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
8
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
9
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
10
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
11
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
12
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
13
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
14
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
15
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
16
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
17
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
19
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

थकबाकीसाठी घरगुती वीज खंडित करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:14 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील थकबाकीपोटी कोणाचीही घरगुती वीज खंडित केली जाणार नाही, अशी ग्वाही महावितरणचे मुख्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील थकबाकीपोटी कोणाचीही घरगुती वीज खंडित केली जाणार नाही, अशी ग्वाही महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी दिली. हा राज्याचा प्रश्न असल्याने ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याच्या मागणीबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करा, या मागणीसाठी साेमवारी वीज बिल कृती समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता निर्मळे यांची भेट घेतली. अनेक ठिकाणी घरगुती ग्राहकांकडे वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा सक्ती करत आहे. मोबाईलवरून नोटीस पाठवून वीज बिल भरा, अन्यथा वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे म्हणतात. जोपर्यंत लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही नियमित बिले भरणार नाही, असे महावितरणला कळविलेले आहे. तरीही सक्ती करणार असाल तर आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा झालेली आहेे. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा करून मीटिंग घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली असताना महावितरणने गडबडीने वसुली सुरू करणे योग्य नाही. यामुळे महावितरण कर्मचारी व ग्राहकांमध्ये संघर्ष होईल, असेही पाटील-किणीकर यांनी सांगितले.

सहा महिन्यांचे बिल सोडून १ ऑक्टोबरपासून नवीन बिले द्या, अशी मागणी बाबा पार्टे यांनी केली. याबाबत ऊर्जामंत्र्यांशी मीटिंग घडवून आणावी, असे सांगत वीज पुरवठा खंडित केला तर होणाऱ्या परिणामास महावितरण जबाबदार राहील, असा इशारा निवास साळोखे यांनी दिला.

यावेळी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, सुभाष जाधव, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : घरगुती वीज बिल माफ करा, या मागणीसाठी साेमवारी वीज बिल कृती समितीने महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांची भेट घेतली. यावेळी विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील, निवास साळोखे, सुभाष जाधव, बाबा इंदुलकर, आदी उपस्थित होते. (फोटो-०१०२२०२१-कोल-महावितरण) (छाया - आदित्य वेल्हाळ)