कोल्हापूर : मी सुसंस्कृत आहे; त्यामुळे नाथा गोळे तालमीच्या गणेशोत्सवाचा मी राजकीय अड्डा करणार नाही, असे स्पष्ट करीत आमदार सतेज पाटील यांनी आपण यापुढे ही आचारसंहिता पाळणार असल्याचे सांगून नवा पायंडा पाडला.नाथा गोळे तालमीने गणेशोत्सवानिमित्त उभारलेल्या ‘गोल्डन टेम्पल’चे मंगळवारी रात्री त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उर्वरित वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला.शिवाजी चौकातील गणेशोत्सव उद्घाटनावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी राजकीय टोलेबाजी केल्यानंतर आमदार पाटील नेमके काय प्रत्युत्तर देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, शिवाजी चौकातील गणपतीसमोरील राजकीय भाषणांविषयी भाविक आणि नागरिकांतून नाराजीचा सूर उमटल्याने पाटील यांनी राजकीय टीकेला फाटा दिला. गेली ४0 वर्षे प्रल्हाद चव्हाण आणि त्यांच्या परिवाराने समाजसेवा केल्यानेच जनतेने त्यांना कायम निवडून दिले आहे, असे पाटील यांनी सांगितले.सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, परिवहन सभापती राहुल चव्हाण, शिक्षण सभापती अशोक जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, तौफिक मुल्लाणी, शारंगधर देशमुख, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, सागर चव्हाण, नगरसेवक जयश्री चव्हाण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मीच फार शहाणामहेश जाधव म्हणाले, ‘गेले दोन दिवस व्हॉट्सअॅपवरून माझ्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत; परंतु मीदेखील खानदानी मराठा असून, शिवाजी पेठेतीलच आहे. त्यामुळे ‘मीच फार शहाणा,’ असे कुणी समजू नये, असा टोला त्यांनी माजी नगरसेवक रवी इंगवले यांचे नाव न घेता लगावला.
गणेशोत्सवाचा राजकीय अड्डा करणार नाही:सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:19 AM