लोकमत न्यूज नेटवर्क
शिरगाव : लोकप्रतिनिधींच्या निधीच्या जोरावर, ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व श्रमदानावर येत्या वर्षाअखेर राशिवडे खुर्द बेले येथील रासलिंग देवालयाचा जीर्णोद्धार पूर्ण करणारच असल्याची ग्वाही लोकनियुक्त सरपंच आशा बाळासाहेब कांबळे (बेलेकर) यांनी दिली. राशिवडे खुर्द बेले (ता. राधानगरी) येथील ग्रामस्थांच्या लोकसहभाग व श्रमदानातून उभारण्यात येणाऱ्या रासलिंग देवालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी सरपंच सदाशिव कृष्णा पाटील होते. भोगावतीचे चेअरमन आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भोगावतीचे व्हाईस चेअरमन उदयसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . उपसरपंच रंजना कांबळे यांनी स्वागत केले. ग्रामसेवक डी. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
फोटो : राशिवडे खुर्द बेले (ता. राधानगरी) येथील रासलिंग देवालयाच्या आया व भूमिपूजन कार्यक्रमात प्रा. अर्जुन आबिटकर यांचा सत्कार करताना सरपंच आशा कांबळे बेलेकर व आर.पी.आय. गटनेते बाळासाहेब कांबळे बेलेकर व इतर उपस्थित होतेे.
-