शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात साखर पेरणी की जातीचा मुद्दा?

By राजाराम लोंढे | Updated: May 2, 2024 16:59 IST

वातावरण टाइट : ‘शेट्टी-सरुडकर-मानें’मध्येच फाइट

राजाराम लोंढेकोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या एंट्रीने ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे गणित काहीसे विस्कळीत केले. बहुरंगी लढत होत असली तरी आघाडीचे पाटील-सरुडकर, ‘स्वाभिमानी’चे शेट्टी व महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांच्यातच फाइट होणार आहे. गेल्या निवडणुकीत ‘वंचित’ने शेट्टींचे विजयाचे गणित बिघडविले; परंतु या निवडणुकीत तो फॅक्टर नाही. मात्र, जातीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.कोल्हापूरप्रमाणेच या मतदारसंघातही खासदार माने यांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटपर्यंत झगडावे लागले. भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला होता. त्यात भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा करून वादळ उठवून दिले. त्यामुळे माने उमेदवारी अर्ज भरेपर्यंत त्यांच्या उमेदवारीबद्दल साशंकता व्यक्त झाली.दुसऱ्या बाजूला शेट्टी व महाविकास आघाडी यांच्यातील घोळही तसाच सुरू राहिला. सुरुवातीला सोबत या म्हणणाऱ्या शेट्टी यांना नंतर उद्धवसेनेने मशाल हातात घेण्याची अट घातली. ती त्यांनी मान्य न केल्याने उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार सत्यजित सरुडकर यांना रिंगणात उतरवून लढतीचे चित्रच बदलून टाकले आहे.

निवडणुकीत गाजत असलेले मुद्दे :

  • खासदार माने यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवली आणि उद्धवसेनेची संगत सोडून शिंदेसेनेत प्रवेश केल्याचा मुद्दा प्रचारात जोरात आहे.
  • या मतदारसंघात प्रथमच शाहूवाडी भागाला उमेदवारी मिळाल्याचा भावनिक मुद्दाही चर्चेत
  • ‘स्वबळ’ शेट्टींची नाव पैलतीरी नेणार का याची उत्सुकता
  • मतदारसंघातील हवा पाहता वंचितचा फॅक्टर यावेळी निष्फळ

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • गतनिवडणुकीत माने यांचा विजय इचलकरंजी शहरानेच निश्चित केला; परंतु गेल्या पाच वर्षांत पाणीप्रश्न जैसे थे आहे.
  • इचलकरंजीच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या वस्त्रोद्योगाबाबत घोषणांचा पाऊस परंतु प्रत्यक्षात काहीच पदरात नाही.
  • पंचगंगा प्रदूषणाचे चटके या मतदारसंघाला जास्त बसतात; परंतु त्याबाबतीतही पाच वर्षांत काही झाले नाही.
  • शाहूवाडी, पन्हाळा भागात औद्योगिक प्रकल्प नाही. तरुणांच्या हाताला रोजगार नाही.

वाळवा-शिराळ्यावर सरुडकरांची भिस्तउद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी हवा तयार केली आहे. त्यांचे ‘शाहूवाडी’ होमपिच असून, विश्वासराव नाईक साखर कारखान्यामुळे शिराळ्यात राबता आहे. आमदार जयंत पाटील यांची वाळव्यात ताकद असल्याने या मतदारसंघावरच सरुडकरांची भिस्त आहे.

कारखानदारांची ‘साखर’ पेरणी निर्णायकहातकणंगले’त दहा साखर कारखाने असून, ही ताकद सरुडकर व धैर्यशील माने यांच्यात विभागणार आहे. शेवटच्या क्षणी अंदाज घेऊन कारखानदार करणारी ‘साखर’ पेरणीच निर्णायक ठरू शकते.

मानेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या जोडण्याउमेदवारीबाबत झालेल्या गोंधळामुळे मानेंना स्पर्धेत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगलेत तळ ठोकून नाराजांची नाराजी दूर करत गेल्यावेळच्या विजयातील घटकांना सोबत घेण्याची खेळी खेळली आहे.

‘स्वबळ’ शेट्टींची नाव पैलतीरी नेणार का?राजू शेट्टी हे २००९ ला ‘रिडालोस’कडून, २०१४ महायुती, तर २०१९ महाविकास आघाडीसोबत लढले. पहिल्यादांच ते स्वबळावर लढत आहेत. साखर कारखानदारांना अंगावर घेऊन शेतकऱ्यांना उच्चांकी ऊस दर दिल्याचा मुद्दा ते मांडत आहेत.

एकूण मतदार

  • १८,०१,२०३
  • पुरुष : ९,१९,६४६
  • महिला : ८,८१,४६६

२०१९ ला काय घडले...?

  • धैर्यशील माने शिवसेना (विजयी) - ५,८५,७७६
  • राजू शेट्टी स्वाभिमानी पक्ष - ४,८९,७३७
  • असलम सय्यद वंचित बहुजन आघाडी - १,२३,७७६
  • नोटा  -  ७१०८

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?२०१४ राजू शेट्टी (स्वाभिमानी) ६,४०,४२८ : ५३.८० टक्के२००९ राजू शेट्टी (स्वाभिमानी) ४,८१,०२५ : ४९.१७ टक्के२००४ निवेदिता माने (राष्ट्रवादी) ४,२२,२७२ : ५३.३७ टक्के१९९९ निवेदिता माने (राष्ट्रवादी) ३,३७,६५७ : ४१.६३ टक्के१९९८ कल्लाप्पा आवाडे (काँग्रेस) ३,४४,८१७ : ४७.०७ टक्के

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४dhairyasheel maneधैर्यशील मानेRaju Shettyराजू शेट्टीSatyajit Patilसत्यजित पाटील