कागदपत्रे मराठीतूनच द्यावीत या मागणीवर आपण संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो आणि सहानुभूतिपूर्वक विचार करतो, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.
यावेळी समिती शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या नियमावलीची माहिती आणि आदेशाची प्रत देण्यात आली. कुठल्या क्षेत्रात, कुठल्या भाषेत माहिती द्यावी याचे नियम दाखवून बेळगाव उत्तर व दक्षिण मतदारसंघांत मराठीतून माहिती देण्यासंदर्भात असलेले नियम दाखविण्यात आले.
आपण भाषिक अल्पसंख्याक लोकांचे रक्षणकर्ते आहात; पण तुम्ही दुर्लक्ष करता हे दुर्दैव असल्याचे स्पष्ट करून यापूर्वीचे संदर्भ दाखवून देण्यात आले. याबाबत तक्रार निवारण समिती जिल्हा पातळीवर नेमून त्याद्वारे निर्णय घ्यावा, अशीही बाजू मांडण्यात आली आहे. यावेळी मराठीत कागदपत्रे देण्याचा आदेश त्यांनी दिला.
यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, महेश जुवेकर उपस्थित होते.
निवडणूक आयोगाचा आदेश
कर्नाटक राज्यातील सर्व २२४ विधानसभा मतदारसंघांमधील मतदार याद्या आणि संबंधित कागदपत्रे भाषिक अल्पसंख्याकांच्या सोयीसाठी त्यांच्या भाषेत उपलब्ध करण्याचा आदेश भारतीय निवडणूक आयोगाच्या शिफारशीवरून माननीय राष्ट्रपतींनी गेल्या १९ फेब्रुवारी २००८ रोजी काढला आहे.
फोटो ओळी - भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव ऋत्विक पांडे यांच्या स्वाक्षरीने उपरोक्त यादी जाहीर करण्यात आली आहे.
फोटो : जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याशी चर्चा करताना समितीची नेतेमंडळी.