शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

शंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 1:37 PM

ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

ठळक मुद्देशंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावलीउर्वरित १३ कारखानेही पंधरा दिवसांच्या आत बंद होणार

कोल्हापूर : ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

उर्वरित १३ पैकी तीन-चार कारखान्यांचा अपवाद वगळता सर्व कारखाने या आठवडाभरातच हंगाम गुंडाळणार आहेत. यामुळे यंदा जेमतेम १२० दिवसांचाच हंगाम होणार आहे. एकरकमी ‘एफआरपी’वरून शेतकरी संघटनेचा दबाव आणि साखर उद्योगाविषयीचा सरकारचा धोरणलकवा यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून सुरू असलेला अडचणीचा डोंगर सांगतेलाही कायम राहिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दौलत’ वगळता उर्वरित २२ कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. साधारपणे १२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळपास सुरुवात केली. दरम्यान प्रतिदिन गाळपक्षमता वाढली तरी आंदोलनामुळे कारखान्यांचे गाळप मधले काही दिवस बंद ठेवावे लागले. तरीही त्यानंतर वेग घेत कारखान्यांनी हंगाम रेटत आणला.गेल्या वर्षी शाहू, जवाहर, गुरुदत्त, दत्त-शिरोळ या कारखान्यांचे हंगाम २ ते २४ एप्रिल या कालावधीत संपले होते. उर्वरित कारखाने ८ ते २५ मार्च या कालावधीत संपले होते. यावर्षी पंचगंगा हा एकमेव कारखाना २५ मार्चपर्यंत चालणार आहे. उर्वरित दत्त- शिरोळ, जवाहर, गुरुदत्त, शाहू, वारणा, बिद्री, शरद, मंडलिक, दालमिया हे प्रमुख कारखानेदेखील १५ दिवसांतच हंगाम गुंडाळणार आहेत.

...म्हणून हंगाम लवकर आटोपलाया वर्षी जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होता; पण जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाची वाढ खुंटली. परिणामी उसाचे क्षेत्र वाढूनही एकरी उतारा निम्म्यापेक्षाही कमी झाला. गाळपासाठी गुणवत्तेचा ऊसच उपलब्ध नसल्याने गाळपाचा हंगाम लवकर आटोपला आहे.

साधारपणे किमान १६० दिवस हंगाम चालला तरच साखर कारखान्यांना फायदा मिळतो. यापेक्षा कमी दिवस हंगामाचे झाले तर उत्पन्न तर कमी मिळतेच; शिवाय देखभालीचा खर्चही अंगावर पडत असल्याने साखर उद्योगाच्या तोट्यात भरच पडते. आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देण्याचीही क्षमता कारखान्यांकडे राहिलेली नाही. सरकारने मदतीसाठी आधीच हात वर केले आहेत. त्यामुळे हंगाम संपला तरी एफआरपीचा तिढा कायम राहणार आहे.

आजअखेर बंद झालेले कारखानेभोगावती, राजाराम, गडहिंग्लज, आजरा, डी. वाय. पाटील, अथणी शुगर्स, हेमरस, महाडिक शुगर्स. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर