शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘फॅन्सी’ नंबरपोटी तीन महिन्यांत साडेपाच कोटी

By admin | Published: August 13, 2016 12:07 AM

‘प्रादेशिक परिवहन’ मालामाल : आवडत्या क्रमांकासाठी मोजले दोन हजारांपासून १२ लाख रुपये

सचिन भोसले - कोल्हापूर-कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत चार उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये केवळ तीन महिन्यांत फॅन्सी नंबरपोटी साडेपाच कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. अशा पद्धतीने जमा झालेली रक्कम मोठ्या शहरांच्या मानाने विक्रमी मानली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात दुचाकी, चारचाकी गाडीला चांगला आकर्षक नंबर हवाच, असा अट्टाहास बऱ्याच लोकांचा असतो. मग ट्रक असला तरी त्या ट्रकला अमूकच नंबर हवा म्हणून त्यापोटी पाच हजार ते दीड लाख रुपये मोजणारे लोक आहेत. त्यात १, ५, ७, ९, ११, २५, ९९, १२३, १११, २५२६, ९२९२, १२३४, अशा आकर्षक क्रमांकाला तर म्हणेल ती बोली लिलावात बोलली जाते.महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आकर्षक नंबरसाठी लिलाव आयोजित केला जातो. त्यात अनेक हौशे-नवशे जातीनिशी आकर्षक क्रमांकाला बोली बोलतात आणि हवा तो क्रमांक आपल्याच पदरी पाडण्यासाठी इर्षा करतात, असे चित्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाहण्यास मिळते. त्याचा परिपाक म्हणून एप्रिल ते जुलै २०१६ अखेर कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ५ कोटी ३७ लाखांचा महसूल गोळा झाला आहे. हा जमलेला महसूल इतर मोठ्या शहरांच्या मानाने जादाचा असल्याने हा एक विक्रमच ठरला आहे. त्यामध्ये दुचाकीचा क्रमांक चारचाकीला हवा असेल तर ठरलेल्या किमतीपेक्षा जादा पैसे लिलावात मोजावे लागतात. अशा प्रकरणांमध्ये कोल्हापुरात एका वाहनधारकांने तब्बल १२ लाख रुपये मोजले आहेत. या जमा महसुलात आकर्षक क्रमांकाच्या प्रेमापोटी काही हौशी वाहनधारकांनी अगदी २००० पासून ३ लाख रुपयांपर्यंत रक्कम मोजली आहे. पारदर्शी यंत्रणेमुळे इतका महसूल जमा झाला आहे. त्यामध्ये दर महिन्याला फॅन्सी नंबरसाठी लिलाव आयोजित केला जातो. त्यात सर्वांना समान संधी दिली जाते. अमूक एका नंबरसाठी ज्याची बोली उच्च असेल त्याला तो नंबर दिला जातो.- लक्ष्मण दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत जमा झालेला महसूल पुढीलप्रमाणेकार्यालयक्रमांक प्रकरणेजमा रक्कमकोल्हापूर२६१३२,१३,०,५०००सांगली२४२४१,८६,१०,०००सातारा११८११,०८,७४,०००कराड५५०२९,१२,०००एकूण६७६८५,३७,०१,०००