कोल्हापूर, 10 : थकीत बिले दिल्याशिवाय साखर कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाहीत, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकºयांची गेल्या वर्षीची बिले अद्याप दिलेली नाहीत. बिले थकीत असल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी थकीत बिले दिल्याशिवाय या वर्षी साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेने घेतली आहे.
थकीत बिले देण्यास टाळाटाळ अथवा चालढकल करणारे कारखानदार, त्यांच्या अध्यक्षांना सरकारदरबारी उभे करून संबंधित बिले देण्यास भाग पाडले जाईल. सन २०१७-१८ साठीच्या गळीत हंगामास उसाची पहिली उचल एफआरपी अधिक ३०० रुपये विनाकपात मिळावी. साखरेचा हमीभाव कमीत कमी ४००० रुपये प्रतिक्विंटल असावा. राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आॅनलाईन करण्यात यावेत. साखरेचा दर उद्योगधंद्यांसाठी वेगळा आणि घरगुती उपयोगाकरिता वेगळा आकारण्यात यावा. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाची तत्काळ नियुक्ती करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळांवर अध्यक्षांची नियुक्ती करावी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी योग्य ती पूर्तता करून समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी ‘रयत’चे संस्थापक, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या मागण्यांचे त्यांना निवेदन दिले. ‘रयत’च्या पहिल्या महाराष्ट्र दौºयाची सुरुवात आज, बुधवारी विदर्भातून होणार आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, उस्मानाबाद, बीड, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा दौºयात समावेश आहे. चिखली (जि. बुलढाणा) येथे दि. ३१ आॅक्टोबरला राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होईल. यानंतर दि. १० नोव्हेंबरला ऊस परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेस श्रीकांत घाटगे, राजू सावंत, दीपक भोसले, भरत पाटील, मधुकर पाटील, आदी उपस्थित होते.
संघटनेची राज्य कार्यकारिणीमुंबई येथे संघटनेची गुरुवारी (दि. ५) संस्थापक, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये संघटनेच्या राज्य दौºयाबाबत चर्चा झाली. राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये सुरेश पाटील (प्रदेशाध्यक्ष), सतीश बारूलकर (कार्याध्यक्ष), शार्दूल जाधवर (युवा प्रदेशाध्यक्ष), राहुल मोरे (उपाध्यक्ष), पांडुरंग शिंदे, जितू अडोलकर, भानुदास श्ािंदे (राज्य प्रवक्ता) यांचा समावेश आहे.