कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीशिवाय रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल. हिंदू समाजाच्या मदतीवर येत्या पावणेदोन वर्षांत या सिंहासनाचे काम पूर्ण केले जाईल, असे प्रतिपादन संभाजीराव भिडे-गुरुजी यांनी गुरुवारी येथे केले.
येथील बिंदू चौकामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘३२ मण सुवर्ण सिंहासन पुनरपी प्रतिष्ठान’ असा होता. यात संभाजीराव भिडे-गुरुजी म्हणाले, रायगडावर साकारण्यात येणारे हे ३२ मण सुवर्ण सिंहासन पुन्हा हिंदवी स्वराज्य घडविण्यासाठी स्फूर्ती देईल. त्यामुळे या सिंहासनाच्या पुनरपीसाठी हिंदू समाजाने मदतीचा हात द्यावा. राष्ट्रीयत्वाची जाण असलेल्या लोकांनी राष्ट्रीयीकृत बँकेतील प्रतिष्ठानच्या खात्यावर चलनाद्वारे मदत जमा करावी. प्रत्येक तरुणाने किमान एक ग्रॅम सोने द्यावे. या व्याख्यानाच्या प्रारंभी संभाजीराव भिडे-गुरुजी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर अध्यक्ष शरद माळी, आशिष लोखंडे, सुरेश यादव, सुधाकर सुतार , बंडा साळोखे, शिवानंद स्वामी, रोहित अतिग्रे, अतुल शिंदे, रोहित पाटील, अभिषेक जाधव, प्रथमेश मोरे, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात गुरुवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित व्याख्यानात संभाजीराव भिडे-गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.कोल्हापुरात गुरुवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संभाजीराव भिडे-गुरुजी यांचे व्याख्यान झाले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.