शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
3
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
4
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
6
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
8
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
9
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
10
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
11
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
12
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
13
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
14
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
16
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
17
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
18
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
19
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
20
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर

अमोल पवारला साक्षीदाराने ओळखले

By admin | Published: May 01, 2016 12:59 AM

सेंट्रिंग कामगार खून प्रकरण : आरोपीची ओळख परेड

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड रस्त्यावरून जाताना कडगाव येथे क्रशर खडी फोडण्याचा कारखाना आहे. या कारखान्यातून रमेश नाईक याला घेऊन जाताना संशयित आरोपी अमोल पवारला मी स्वत: पाहिले आहे. असे त्याच्याकडे बोट करून प्रत्यक्षदर्शी एका साक्षीदाराने सांगितले. संशयित आरोपीची ओळख परेड आजऱ्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासमोर शनिवारी बिंदू चौक कारागृहात दुपारी दोन वाजता झाली. यावेळी अन्य तीन साक्षीदार फितूर झाले. त्यांनी आम्ही ओळखत नसल्याचे सांगितले. या संपूर्ण ओळख परेडचा रिपोर्ट तहसीलदार ठोकडे यांनी बंद लखोट्यातून न्यायालयाकडे सादर केला. कडगाव येथील क्रशर खडी फोडण्याच्या कारखान्यातून दि. २८ फेब्रुवारीला अमोल पवार याने आपल्या आय-२० या कारमधून रमेश नाईकला चरखुदाईच्या कामाचे आमिष दाखवून नेले. त्यानंतर स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह रमेशला जाळून मारले. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अमोलसह त्याचा भाऊ विनायक पवार या दोघांना अटक केली. रमेशला अमोल पवार घेऊन जाताना ५० ते ६० प्रत्यक्ष साक्षीदारांनी पाहिले आहे. त्यामुळे पवार याची ओळख परेड घेण्यासाठी पोलिसांनी आजऱ्याचे प्रथमवर्ग न्यायाधीश एस. यु. महादार यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मंजुरीनंतर शनिवारी ओळख परेड घेण्याचा निर्णय झाला. अशी झाली ओळख परेडपोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित हे शनिवारी दुपारी चौघा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना घेऊन बिंदू चौक कारागृहात गेले. यावेळी त्यांच्यासोबत आजऱ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, सरकारी पंच विक्रीकर अधिकारी शंकर पाटील, प्रशांत चव्हाण होते. कारागृह प्रशासनाच्या परवानगीनंतर सर्वांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी चौघा साक्षीदारांच्या समोर एका रांगेत वेगवेगळ्या चेहऱ्याच्या दहा संशयितांना उभे केले. तहसीलदार ठोकडे यांनी एका लहान मुलासह चौघा साक्षीदारांना रमेश नाईक याला घेऊन गेलेला आरोपी यापैकी कोण आहे? अशी विचारणा केली. त्यावर लहान मुलासह तिघांनी यापैकी आम्ही कोणालाच ओळखत नसल्याचे सांगितले; परंतु चौथ्या साक्षीदाराने सर्वांकडे नजर फिरवत अमोलवर रोखली. साक्षीदार फितूरची भीती नाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी यापूर्वी संशयित अमोल पवार याची कलम १६४ नुसार आजऱ्याचे प्रथमवर्ग न्यायाधीश महादार यांच्यासमोर ओळख परेड घेतली आहे. यावेळी आताच्या चौघाही साक्षीदारांनी रमेश नाईक याला अमोल पवार घेऊन जाताना आम्ही पाहिले असल्याचा कबुली जबाब दिला आहे. त्यापैकी तीन साक्षीदार तहसीलदारांच्या ओळख परेडमध्ये फितूर झाले. या साक्षीदारांचा आरोपीला फायदा होईल असे नाही. कारण त्यांनी यापूर्वी न्यायालयासमोर कबुली जबाब दिल्याने न्यायालयात तो ग्राह्य धरला जाईल. साक्षीदार फितूर झाले तरी या गुन्ह्याच्या खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही तपासामध्ये भक्कम पुरावे न्यायालयासमोर ठेवले आहेत, असे पोलिस निरीक्षक मोहिते यांनी सांगितले.