कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमा टॉकीज परिसरात पत्रके वाटून निषेध केला.या परिसरात सकाळी अकराच्या सुमारास युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. ‘इंधन दरवाढ करणाºया भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘मोदी सरकारचे करायचे काय?’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर या परिसरात निषेधाच्या पत्रकांचे वाटप करण्यात आले.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक थोरात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या कल्याणी माणगावे, सचिन रावळ, स्वप्निल सावंत, वैभव पाटील, अजिंक्य पाटील, प्रसाद सावंत, शुभम चौगले, सुयोग गोरे, व्यंकटेश राऊत, मकरंद कवठेकर, प्रशांत गणेशाचार्य, किशोर आयरे, राकेश माळवी, मुकेश भाट, आदी सहभागी झाले.
या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सन २०१४ पासून महागाईने जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले.-दिपक थोरात, अध्यक्ष, कोल्हापूर शहर युवक काँग्रेस