कोल्हापूर : तपासासाठी घरी गेल्यानंतर पोलिसांनाच अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी लक्षतीर्थ वसाहतीमधील यासीन मौला बागवान (वय-२७) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला.पोलिसांनी सांगितले की, यासीन याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तपासासाठी आज, शुक्रवारी त्याच्या घरी गेले. त्यावेळी त्याने घराच्या दारातच तुम्ही मला विचारणारे कोण, तुम्ही मला चेक करायचे नाही, असे प्रश्न करत पोलिसांशी हुज्जत घालत अरेरावी केली. तर, कोणतीही माहिती पोलिसांना दिली नाही. उलट शिवीगाळ करून दंगा मस्ती करीत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी उपनिरीक्षक कवळेकर यांनी फिर्याद दिली.
कोल्हापूर: तपासासाठी घरी गेलेल्या पोलिसांना अरेरावी, गुन्हेगारावर गुन्हा दाखल
By भीमगोंड देसाई | Published: September 02, 2022 4:10 PM