अंजर अथणीकर - सांगली -महापालिका क्षेत्रामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहांची वानवा असून, त्यामुळे महिलांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. याबाबत आता महिला संघटना आंदोलन उभाण्याच्या तयारीत आहेत. महापालिका हद्दीत सुमारे दोन लाख महिला आहेत. त्याचबरोबर बाहेरगावाहूृन येणाऱ्या महिलांची संख्याही मोठी असताना, याठिकाणाी केवळ पंधरा स्वच्छतागृहे आहेत. तीही मोडकळीस आलेली आहेत. महिलांच्या या गंभीर प्रश्नाबाबत प्रशासकीय उदासीनता दिसत आहे. आंदोलनाचा इशारामहिलांसाठी स्वच्छतागृहे हा विषय कोणीही गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्याच्या मागणीच्या निवेदनांना कचऱ्याची टोपली दाखविण्यात येत आहे. यापुढे यासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सुधार समितीच्या राणी यादव, मनीता पाटील आदींनी दिला आहे. बाहेर जाताना महिला पाणी पिणे टाळतात...शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्यामुळे घरातून बाहेर पडताना अनेक महिला पाणी पिणे टाळत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती सुधार समितीच्या सदस्या अरुणा शिंदे व पद्मजा मगदूम यांनी दिली. गरोदर महिलांना, मधुमेही रुग्णांना याचा खूप त्रास होत आहे. याविरोधात आम्ही महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आता विविध महिला संघटना एकत्रित करुन तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.शहरातील स्वच्छतागृहांची संख्या वाढवा म्हणून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना अनेकदा निवेदने दिली, मात्र याची गांभीर्याने दखल कोणी घेतली नाही. आता प्रत्येक प्रभागनिहाय नगरसेवकांची जिजाऊ ब्रिगेड व अन्य महिला संघटनांच्यावतीने भेट घेण्यात येईल. त्यांंना त्यांच्या प्रभागात महिलांसाठी किमान एक तरी स्वच्छतागृह उभारावे, असा आग्रह धरण्यात येईल.- आशा पाटील, जिल्हाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेडमहापालिका क्षेत्रातील स्वच्छतागृहांची स्थिती178- पुरुष स्वच्छतागृह15 -महिला स्वच्छतागृह
सांगली पालिका हद्दीत महिला स्वच्छतागृहांची वानवा
By admin | Published: September 18, 2014 10:57 PM