शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

दुचाकीवरुन पडल्याने महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भरधाव दुचाकीवरुन प्रवास करताना अचानक भोवळ येऊन रस्त्यावर पडल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भरधाव दुचाकीवरुन प्रवास करताना अचानक भोवळ येऊन रस्त्यावर पडल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. सुमती सुभाष सदरेकर (वय ६२, रा. शिवाजीनगर, हुपरी) असे जखमीचे नाव असून, हा अपघात हुपरी ते उत्तूर मार्गावर झाला. सुमती या त्यांचा मुलगा नामदेव सदरेकर याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जात असताना ही दुर्घटना घडली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर कागलनजीक लक्ष्मी टेकडीजवळ भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात उत्तम बाळकृष्ण मुसळे (वय ३४, रा. संकेश्वर, ता. चिक्कोडी) हे जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रस्ते अपघातात जखमी

कोल्हापूर : गोकुळ शिरगावनजीक मयूर पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. भिकाराम चापलाल घारु (वय २४, रा. कागल) असे जखमीचे नाव असून, त्याला गंभीर स्थितीत १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर रुग़्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

सायकलची चोरी

कोल्हापूर : येथील नागाळा पार्क, महावीर महाविद्यालय परिसरातील वसंत निवारा बिल्डींग येथील पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे दहा हजार रुपये किंमतीची सायकल अज्ञाताने चोरुन नेली. बिल्डींगमधील वाॅचमन बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञाताने सायकल चोरल्याची शक्यता आहे. दीपक लक्ष्मण पवार (वय ३९, रा. नागाळा पार्क) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सायकल चोरीची तक्रार दिली आहे.

लक्ष्मीपुरी भाजी मार्केटमधून मोबाईलची चोरी

कोल्हापूर : येथील रविवार पेठेतील लक्ष्मीपुरी मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी गेलेल्या वृध्दाच्या खिशातील सुमारे सात हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञाताने चोरुन नेला. याबाबत अब्दुलमजीद रसुल मुल्ला (वय ६९, रा. विजयनगर हाऊसिंग सोसायटी, कदमवाडी रोड) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

दुचाकीच्या धडकेत कोथळीची महिला गंभीर

कोल्हापूर : कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर कोथळी (ता. करवीर) येथे भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पादचारी महिला गंभीर जखमी झाली. आक्कुबाई दत्यात्रय पाटील (वय ७०, रा. कोथळी, ता. करवीर) असे जखमींचे नाव असून, ही घटना रविवारी सायंकाळी घडली. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर खासगी रुग़्णालयात उपचार सुरु आहेत. आक्कुबाई यांचा मुलगा अशोक दत्तात्रय पाटील (रा. कोथळी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन दुचाकीस्वार दीपक जालंदर आंबी (वय २६, रा. चांदणी गल्ली, राशीवडे, ता. करवीर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.