याबाबत अधिक माहिती अशी अश्विनी ही नेहमीप्रमाणे चिंचवाड येथील इलेक्ट्रिकल दुकानात कामास गेली होती. तिच्या अचानक पोटात दुखू लागल्याने ती चिंचवाड येथील घरी येण्यास निघाली होती. ती मूकबधिर असल्याने तिला बोलता व ऐकण्यास येत नव्हते. चिंचवाड येथील स्मशानभूमी लगत असणारे रेल्वे रूळ ओलांडून घरी जात होती . त्याच दरम्यान रेल्वे इंजिन कोल्हापूरहून मिरजकडे जात होते. रेल्वे ड्रायव्हरने हॉर्न केला पण तिला ऐकू न आल्याने तिला रेल्वे इंजिनची जोराची धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या घरामध्ये एक भाऊ व बहीण ही मूकबधिर आहेत. तिचा विवाह ही एका मूकबधिर व्यक्तीबराेबर झाला आहे. या घटनेने चिंचवाड सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची फिर्याद चुलते विजय भाऊ कांबळे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास पोलीस हवालदार विराज डांगे करत आहेत.
०१ अश्विनी अमोल धुमाळे