शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

फरशीवर आपटून फिरस्त्या महिलेचा खून

By admin | Published: September 23, 2014 12:44 AM

संशयित ताब्यात : लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथील घटना

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथील श्री सेल्स दुकानगाळ्याच्या समोरील पायरीवर झोपलेल्या फिरस्त्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार आज, सोमवारी सकाळी उघडकीस आला. वहिदा इस्माईल चोचे ऊर्फ महात (वय ५०, रा. भोई गल्ली, रविवार पेठ, मूळ गाव फेजीवडे, ता. राधानगरी) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या नेहमी सहवासात असणारा संशयित कृष्णात बाळू म्हाळुंगेकर (वय ५२, रा. ठिकपुर्ली, ता. राधानगरी) यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा खून वैयक्तिक कारणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, लक्ष्मीपुरी कोेंडा ओळ येथील श्री सेल्स दुकानासमोर रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह पडलेला  नागरिकांना दिसला. या प्रकाराची माहिती त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पाहिला असता तोंडाला गंभीर जखम झाल्याचे दिसून आले. मारेकऱ्याने केस पाठीमागे पकडून फरशीवर तोंड आपटून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. रविवारी रात्री दुकानासमोरील पायऱ्यांवर पोते पांघरून ती झोपली होती. शेजारी तिने चप्पलाही काढल्या होत्या. तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र व कानात रिंगा होत्या. त्याला मारेकऱ्याने हात लावला नव्हता. पोलिसांनी आजूबाजूच्या सिक्युरिटी गार्ड व नागरिकांकडे चौकशी केली तसेच तिच्या नेहमी सहवासात असणारा संशयीत कृष्णात म्हाळुंगेकर याला चौकशीसाठी पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले. यावेळी श्वान पथकाद्वारे मारेकऱ्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले. (प्रतिनिधी) सुशिक्षित घराण्यातील महिलावहिदा महात हिचे भोई गल्लीमध्ये घर आहे. त्या ठिकाणी तिचे भाऊ राहतात. तिचा पती राधानगरी येथे आहे. एक मुलगा पनवेलला, तर विवाहित दोन मुली सातारा व मुक्त सैनिक वसाहतीमध्ये राहतात. गेल्या सात वर्षांपासून ती घराबाहेर पडली होती. भीक मागून मिळेल त्या जागी झोपणे असा तिचा दिनक्रम होता. लक्ष्मीपुरी कोंडा ओळ परिसरातच फिरत असायची. गेल्या काही वर्षांपासून तिच्यासोबत कृष्णात म्हाळुंगेकर हा फिरत होता. तो परिसरातीलच एका दुकानात हमालाचे काम करत असे. त्यांच्यात मोठमोठ्याने वादावादीचे प्रकारही होत असत. रात्रीच्या वेळी ती मोठमोठ्याने शिवीगाळ करताना नागरिकांना दिसे. काहीवेळा तिची मुलगी व जावई तिला खर्चासाठी पैसे देऊन जात असत. आज सकाळी तिचा खून झाल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘सीरियल किलर’ची आठवणमहिलेचा खून झाल्याचे वृत्त शहरभर पसरताच पुन्हा सीरियल किलर अवतरला की काय, अशी भीती नागरिकांना वाटू लागली. यापूर्वी सीरियल किलरने फिरस्त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केले होते. हा खूनही तसाच असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. हा खून सीरियल किलरने केला आहे का, अशी चौकशीही काही नागरिकांनी पोलिसांच्याकडे केली.