डाॅ. नरके म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांंकरिता शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. चूल आणि मूल सोडून महिलांनी हाती पेन घेतला तर प्रगती होईल. प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी राहिल्यामुळेच त्याला यश प्राप्त होते. आजच्या आधुनिक जगात सिंधुताई सपकाळ, मदर तेरेसा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांनी महिला काय करू शकतात हे जगाला दाखवून दिले आहे. यावेळी गीता आरळेकर, नंदिनी कागलकर, मानसी ठक्कर, अंकिता यादव, प्रिया मोघे, संजय मागाडे, आदी उपस्थित होते.
फोटो : ०८०३२०२१-कोल-नीता नरके
आेळीे : राजारामपुरीत सोमवारी महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी डाॅ. नीता नरके यांच्यासोबत मान्यवर उपस्थित होते.
‘प्रादेशिक परिवहन’मध्ये महिला दिन उत्साहात
कोल्हापूर : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांच्या हस्ते कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.
यानिमित्त कार्यालयातील महिला कर्मचारी सुषमा रेपे यांनी अहमदनगर येथे झालेल्या ९० कि.मी. सायकलिंग व २५ कि.मी. धावणे अशी स्पर्धा सात तासांत पूर्ण करीत विक्रमी वेळ नोंदविल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच ऑटो रिक्षा संघटनेतर्फे सुभाष शेटे व ईश्वर चन्नी यांनीही महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, रोहित काटकर, अजित ताम्हणकर, आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन राजू कोळी यांनी केले.
फोटो : ०८०३२०२१-कोल-आरटीआे
ओळी : कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला.