वेंगुर्ले : कोल्हापूर येथून पर्यटनासाठी आलेली वर्षा नामदेव फराकटे (२७) ही महिला वेंगुर्ले बंदरानजीकच्या समुद्रात बुडाली. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होता. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर कळंबा करवीर परिसरातील रहिवासी सौ. वर्षा नामदेव फराकटे ही तिची आई रत्नप्रभा नामदेव फराकटे (४५), बहिण सुजाता सागर पाटील (२५) यांच्यासह सुजाताची दोन मुले, चालक व त्याचा मित्र अशी मंडळी पर्यटनासाठी आली होती. बुधवारी सायंकाळी फराकटे कुटुंबीय वेंगुर्ले येथील सागर बंगल्यानजीकच्या किनार्यावरील खडकांवर उभ्या असणार्या वर्षा फराकटे या समुद्राच्या लाटेबरोबर वाहून गेल्या. यावेळी गाडी चालकाच्या मित्राने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यांच्या बुडण्याची माहिती बहिण सुजाता हिने वेंगुर्ले पोलिसात दिली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता. (प्रतिनिधी)
कोल्हापुरातील महिला वेंगुर्ले समुद्रात बुडाली
By admin | Published: May 29, 2014 12:38 AM