शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बलात्काऱ्यांच्या एन्काऊंटरनंतर महिलांनी वाटली साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 4:12 PM

बलात्काराच्या आजपर्यंतच्या घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळालेला नाही. अनेक आरोपी मोकाट आहेत. हे चित्र बदलणारी घटना शुक्रवारच्या एन्काउंटरमुळे घडली; यामुळे समाजात अशी जरब बसेल की मुली, महिलांवर बलात्कार करणे, त्यांची अमानुषपणे हत्या करणे याला जिवे मारण्याचीच शिक्षा मिळेल. खरे तर हा दिवस आनंद साजरा करण्याचा नाही; पण याद्वारे पोलिसांचे अभिनंदन करीत आहोत, अशा भावना व्यक्त करीत कोल्हापुरातील महिलांनी हैदराबादमधील बलात्काऱ्यांच्या पोलिसांकडून झालेल्या एन्काऊंटरनंतर साखर वाटप केले.

ठळक मुद्देबलात्काऱ्यांच्या एन्काऊंटरनंतर महिलांनी वाटली साखरपीडित दिशाला न्याय : जरब बसण्यासाठी कारवाईचे समर्थन

कोल्हापूर : बलात्काराच्या आजपर्यंतच्या घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळालेला नाही. अनेक आरोपी मोकाट आहेत. हे चित्र बदलणारी घटना शुक्रवारच्या एन्काउंटरमुळे घडली; यामुळे समाजात अशी जरब बसेल की मुली, महिलांवर बलात्कार करणे, त्यांची अमानुषपणे हत्या करणे याला जिवे मारण्याचीच शिक्षा मिळेल. खरे तर हा दिवस आनंद साजरा करण्याचा नाही; पण याद्वारे पोलिसांचे अभिनंदन करीत आहोत, अशा भावना व्यक्त करीत कोल्हापुरातील महिलांनी हैदराबादमधील बलात्काऱ्यांच्या पोलिसांकडून झालेल्या एन्काऊंटरनंतर साखर वाटप केले.

भारतात समतेचा संदेश देणारे, या देशाला कायदा, संविधान बहाल केलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच पीडित दिशाला यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त झाली.हैदराबाद येथील पीडित दिशा या रात्री घरी परतत असताना त्यांच्यावर चार नराधमांनी बलात्कार केला व नंतर त्यांना जाळून मारण्यात आले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. स्त्रीवर बलात्कार होतो, वासनांधतेची बळी झाल्यावरही तिची अमानुषपणे हत्या केली जाते; पण न्यायालयात वर्षानुवर्षे खटला चालूनही दोषींना कठोर शिक्षा होत नाही. राजकीय दबावातून अनेकजण सुटतात, पीडितेला तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अशा नराधमांना भर चौकात मारले पाहिजे, अशी मागणी होत होती.

महिलांसह सर्वसामान्यांमधून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे हैदराबाद पोलिसांनी चारीही बलात्कारी आरोपींवर गोळ्या झाडून त्यांचे एन्काऊंटर केले. ही बातमी सकाळी सगळीकडे पसरली. हे धाडसी पाऊल उचलल्याबद्दल देशभरातून हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.कोल्हापुरातील विविध महिला संघटना, वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिला, युवती, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरचे साखर वाटून स्वागत केले. बिंदू चौकात पीडिता दिशा यांना आदरांजली वाहणारे संदेश, नराधमांचा निषेध करणारे फलक घेऊन महिला एकत्र आल्या.

येथे नागरिक, वाहनचालक, पोलीस, रिक्षाचालक, व्यापारी यांना साखर वाटण्यात आली. यावेळी डॉ. मंजुळा पिशवीकर, डॉ. प्रिया दंडगे, शुभांगी थोरात, वारणा वडगावकर, अ‍ॅड. श्रद्धा शहा, स्वप्नजा घाटगे, स्मिता ओतारी, प्रिया देसाई, ललिता शिंदे, मंजिरी देवण्णावर, स्वाती जाधव, सिद्धी जाधव, योगिता गुळवणी, कविता मोहोळकर यांनी सहभाग घेतला.समाजमाध्यमांवर अभिनंदनाचे पोस्टपोलिसांनी उचललेल्या धाडसी निर्णयाचे वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर सकाळपासूनच व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर पोलिसांच्या अभिनंदनाच्या पोस्ट टाकल्या जात होत्या. हैदराबाद पोलीस अभिनंदन, दिशाला न्याय मिळाला, इललिगली लिगल, मृत्यूनंतरचा आनंद, बलात्कारी पोसायचे नसतात; ठोकायचे असतात, देशभरात हैदराबाद पॅटर्न राबविला पाहिजे, ना कोर्ट - ना वकील - ना तारीख; छत्रपती शासन - सरळ एन्काउंटर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर