महिला काँग्रेसतर्फे गॅस दरवाढविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 07:52 PM2021-07-09T19:52:36+5:302021-07-09T19:52:56+5:30

Congress Kolhapur : गॅस, पेट्रोल, डिझेल सह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, महागाई विरोधात शुक्रवारी कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने चुलीवर जेवण बनवून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, खाद्यतेल, डिझेल-पेट्रोलचे दर कमी झालेच पाहीजे, मोदी सरकार हाय हाय, भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.

Women's Congress protests against gas price hike | महिला काँग्रेसतर्फे गॅस दरवाढविरोधात आंदोलन

कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी काँग्रेस कमिटी येथे चूलीवर जेवण बनवून महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देमहिला काँग्रेसतर्फे गॅस दरवाढविरोधात आंदोलन

कोल्हापूर : गॅस, पेट्रोल, डिझेल सह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, महागाई विरोधात शुक्रवारी कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने चुलीवर जेवण बनवून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, खाद्यतेल, डिझेल-पेट्रोलचे दर कमी झालेच पाहीजे, मोदी सरकार हाय हाय, भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेस कमिटीसमोर झालेल्या या आंदोलनानंतर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरलाताई पाटील म्हणाल्या, यांनी मै देश बिकने नहीं दूंगा म्हणणोरे मोदी देश विकायला निघाले आहेत, उज्वला गॅस योजना देवून सिलिंडर महाग केला आणि महिलांना पुन्हा चुलीपुढे आणून ठेवले.

भाज्या, तेल, जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढवले, महिलांचे आर्थिक गणित कोलमडले असून याचा आम्ही निषेध करतो. निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनशुन्य व चुकीच्या धोरणांमुळे गॅस, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा त्रास घराघरातील महिलांना होत असून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी महिलाध्यक्षा संध्या घोटणे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, शुभांगी साखरे, हेमलता माने, वैशाली महाडीक यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
 

Web Title: Women's Congress protests against gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.