कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बस फुल्ल झाली. राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या या महिला दिनाच्या अनोख्या भेटीमुळे महिला प्रवाशांनी एसटीला धन्यवाद देत शुभेच्छा दिल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले.
कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकांतून कोल्हापूर ते सांगली अशी सोडण्यात आलेली ही केवळ महिलांसाठीची बस उद्घाटनावेळीच हाऊसफुल्ल झाली. पहिल्याच दिवशी कोल्हापूरहून ४२ तर सांगलीहून ४५ अशा ८७ महिला प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला.
- - कोल्हापूर व सांगली विभागांतर्फे नियोजन
- - सकाळी व सायंकाळी दोन सत्रात
- - महिलांची गैरसोय टळणार. अशी सुटणार गाडीकोल्हापूर बसस्थानक : सांगलीकडे सकाळी ९.१५ वा. मार्गस्थ व सायंकाळी ५.४५ वाजता परत
सांगली बसस्थानक : कोल्हापूरकडे सकाळी ९.१५ वा. मार्गस्थ व सायंकाळी ५.४५ वा. परत
महिला प्रवाशांच्या मागणीनुसार अन्य काही मार्गांवरही अशा प्रकाराच्या ‘लेडीज स्पेशल’ गाड्या सोडण्यात येणार आहेत.शैलेंद्र चव्हाण,विभाग नियंत्रक,राज्य परिवहन महांमडळ, कोल्हापूर
मी एका खासगी कंपनीत सांगली येथे नोकरीस आहे. त्यामुळे दररोज कोल्हापूर - सांगली असा प्रवास करावा लागतो. घरातून निघताना नेहमी एकच गाडीत बसण्यासाठी जागा मिळणार का? हा प्रश्न नियमित पडत असत. मात्र,हा प्रश्न लेडिज स्पेशल एस.टीमुळे आता सुटला आहे.- वृषाली यादव,नोकरदार
माझा स्वत:चा व्यवसाय आहे. आठवड्यातीन किमान तीन ते चारवेळा मला सांगलीला जावे लागते. गाडीतून प्रवास करताना आपल्या शेजारी कोण असेल हा प्रश्न सार्वजनिक प्रवास नेहमीच येतो, मात्र ही फक्त महिलांसाठी गाडी असणार त्यामुळे थोडा आधार वाटतो.- शुंभागी माने,उद्योजिका