शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

महिलांत ‘कोल्हापूर ’ , पुरुषांत ‘सांगली’ ला सर्वसाधारण विजेतेपद:परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:11 PM

कोल्हापूर : कोल्हापुरातील पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या पंचेचाळीसाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावत ‘कोल्हापूर’ने, तर पुरुषांमध्ये ‘सांगली’ने

ठळक मुद्देपंचेचाळीसाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा ; ‘उत्कृष्ट खेळाडू’ ठरले जयश्री बोरगी, संतोष माळीआंतरराष्ट्रीय धावपटू जयश्री बोरगी हिचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला महिलांमध्ये विजेत्या कोल्हापूर संघाने १२७, तर सांगलीने ११९ गुणांची कमाई केली

कोल्हापूर : कोल्हापुरातील पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या पंचेचाळीसाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावत ‘कोल्हापूर’ने, तर पुरुषांमध्ये ‘सांगली’ने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. मुलांमध्ये संतोष माळी (सांगली), तर मुलींमध्ये जयश्री बोरगी (कोल्हापूर) यांना ‘उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून गौरविण्यात आले.

पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या २१ कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेत राहुल बोंदर (सोलापूर ग्रामीण), अमरसिंह पावरा (कोल्हापूर), धावणे स्पर्धेत पुरुषांमध्ये सांगलीने, महिलांमध्ये कोल्हापूर संघाने विजेतेपद पटकाविले. हॉकी (कोल्हापूर), बास्केटबॉल (सोलापूर ग्रामीण), व्हॉलीबॉल पुरुष ( सातारा),महिला (सांगली), महिला (सांगली), हॅण्डबॉल पुरुष (सोलापूर ग्रामीण) , खो-खो पुरुष ( सांगली), महिला (कोल्हापूर), कबड्डी पुरु ष (पुणे ग्रामीण) , महिला (कोल्हापूर), यांचा समावेश होता. सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाºया सांगली पुरुष संघाने स्पर्धेतून १४९ गुण, तर उपविजेतेपद पटकाविणाºया कोल्हापूर संघाने १४३ गुण मिळविले. महिलांमध्ये विजेत्या कोल्हापूर संघाने १२७, तर सांगलीने ११९ गुणांची कमाई केली.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,आमदार अमल महाडिक, महापौर हसिना फरास, हिंदकेसरी अमोल बुचडे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, कोल्हापूर पोलीस अधीक्षक सुनील मोहिते, सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी आदी उपस्थित होते.थेट पदोन्नतीराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविणाºयांना पोलीस दलातील कर्मचारी खेळाडूंना पोलीस दलातील ‘वर्ग दोन’च्या पदावर थेट पदोन्नतीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्याचे आश्वासन स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी दिले. त्यामुळे अमेरिकेतील पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर पोलीस दलाचे नाव साता समुद्रापार पोहोचविणाºया कोल्हापूर पोलीस दलातील आंतरराष्ट्रीय धावपटू जयश्री बोरगी हिचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वी दिले होते. याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

कोल्हापुरातील पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या ४५ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे पुरुषांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाºया सांगली संघास विजेतेपदाचा करंडक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, कोल्हापूर पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उपस्थित होते.

कोल्हापुरातील पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या ४५ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे महिलांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाºया कोल्हापूर महिला संघास विजेतेपदाचा करंडक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, कोल्हापूर पोलीस अधीक्षक संजय मोहिते, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. वीरेश प्रभू, सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील,उपस्थित होते.