शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दराच्या युद्धात जिंकले; पण तहात हरले

By admin | Published: November 04, 2016 12:08 AM

ऊस उत्पादकांचा अपेक्षाभंग : एफआरपी एकरकमी; पण वाढीव १७५ जमेल तसेच कारखानदारांकडून मिळणार

 प्रकाश पाटील ल्ल कोपार्डे खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत ३२00 रुपये पहिल्या उचलीचे रणशिंग पुकारल्याने कारखानदारांच्या छातीत धडकी भरली. मात्र, आपणच दरात तडजोड करतोय, असा इतर संघटना आरोप करीत असल्यामुळे, खा. शेट्टी यांनी चर्चेदरम्यान सावध पवित्रा घेतला आणि येथेच कारखान दारांचा दबाव व सरकारमध्ये असल्याची भावना यामुळे एफआरपी पेक्षा १७५ रुपये जादा पदरात पाडत तेही एफआरपीबरोबर एकरकमी नसल्याने, सर्वच संघटना युद्धात जिंकल्या; पण तहात हरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षांत ऊस दरावरून स्वाभिमानी संघटनेने कारखानदारांची आर्थिक अडचण समजून आंदोलनाची भूमिका सोडली होती. मात्र, यावर्षी दुष्काळ, उपसाबंदी, अतिपावसामुळे ऊस उत्पादन घटले आहे. यामुळे ‘कमी उत्पादन जादा भाव’ हा फॉर्म्युला घेऊन, कायद्याने उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे बंधनकारक आहे, हे माहिती असूनही एफआरपी पेक्षा जादा दर मिळाला पाहिजे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी प्रतिटन ३२00 रुपये उचलीची मागणी केली. यामुळे ऊस उत्पादकांत आपणाला न्याय मिळणार म्हणून उत्साह संचारला होता. साखर कारखानदारांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. यातून वारणा व डॉ. डी. वाय. पाटील यांनी हंगाम जबरदस्तीने सुरू करताच वारणेकडे ऊस वाहतूक करणारा ट्रक पेटविला तर डी. वाय. पाटील कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरची मोडतोड करून शेतकरी आक्रमक झाले होते. यामुळे यावर्षी आंदोलन भडकणार, असे चित्र होते. ५ डिसेंबरच्या मुर्हूतावर साखर हंगाम सुरू करण्याबरोबर ऊस टंचाईला तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून, कारखानदारांना घाई झाली होती. यामुळे तीन चर्चेच्या बैठकांमध्येच उसदराचा प्रश्न संपला. मात्र, या हंगामात किमान २८00 ते ३000 रुपये प्रतिटन मिळण्याच्या अपेक्षेवर केवळ १७५ रुपये एफआरपीपेक्षा जादा तेही एफआरपी एकरकमी न होता एफआरपीचा दर एकरकमी व १७५ रुपये उपलब्ध होतील, तसे दुसऱ्या हप्त्यात देण्याच्या आलिखित करारामुळे उत्पादकांच्या आशेवर पाणी पडले आहे. गेल्या दोन वर्षांत उत्पादन खर्चात किमान १५ ते २0 टक्के वाढ झाली असून, एफआरपीत एक पैसाही वाढला नाही. चर्चेला बसताना नेहमी ऊस उत्पादकांच्या हिताचाच विचार डोळ्यासमोर असतो. एफआरपीपेक्षा जादा दर मिळालाच पाहिजे म्हणून, आम्ही धोरण अवलंबिले. यातून तोडगा म्हणून १७५ रुपये एफआरपीपेक्षा जास्त देण्याचा तोडगा काढला असून, ७0:३0 च्या फॉर्म्युल्याने आम्ही आजही ३२00 रुपयांवरच ठाम आहोत. एफआरपी एक रकमी व १७५ राज्य बँकेकडून निधी उपलब्ध करून दिल्यानंतर देण्याचे कारखानदारांनी मान्य केले आहे -खा. राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी संघटना. खताचे प्रतिक्विंटल दर २४00 ते २६00 रुपये झाले आहेत. एक टन ऊस उत्पादनाचा खर्च शेताच्या बांधावर येऊन काढल्यास ३२00 रुपये प्रतिटन हा दर सुद्धा कमी होतो. केवळ शासनामध्ये स्वाभिमानी संघटना सामील झाल्यामुळे खा. शेट्टी बॅकफूटवर आले आहेत. तर ३५00 रुपये दर मागणारे शेतकरी सशंघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनीही चर्चेत आक्रमक भूमिका न घेता ऊस उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे स्पष्ट झाले. -धीरज पाटील, शेतकरी, कुडित्रे, ता. करवीर. संघटनेने दबाव निमार्ण केला होता. संघटनेने दराचा तोडगा निघेपर्यंत उसतोड क रू देऊ नका, असे आवाहन करूनही वारणा, डी. वाय. पाटील यांनी तोड सुरू केल्याने पुन्हा संघर्षच करीत राहायचे काय? ही मानसिकता कदाचित नेत्यांमध्ये निर्माण असणारे कारखानदार १७५ रुपये तरी जादा द्यायला तयार झाले. ही दरवाढ निश्चित कमी आहे. आणखीन धीर धरला असता, तर ३000 रुपयांपर्यंत दरवाढ मिळाली असती. -विठ्ठल पाटील, शेतकरी पाटपन्हाळा संघटना, कारखानदार, शासन हे एकाच माळेचे बनले आहेत. यांनी शेतकऱ्यांचा बळी घेतलाय. १७५ रुपये दरवाढ ही शेतकऱ्यांची बोळवणच आहे. जर ३00 रुपयांच्या आसपास वाढ झाली असती, तर कष्टकरी ऊस उत्पादकांच्या हातात ३00 कोटी गेले असते. यातून जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्त झाला असता; पण ऊस उत्पादकांच्या अन्नात माती कालविली. -कुंडलिक पाटील, दोनवडे, ता. करवीर. घुमजाव करण्याची शक्यता साखरेचे दर ३५00 रुपयांच्यावर गेले, तरच १७५ रुपये देणे शक्य होणार आहे, अशा प्रतिक्रिया कारखानदारांतून व्यक्त होत आहेत. जर शासनाच्या धोरणाने साखरेचे दर खाली आले, तर हे १७५ रुपये देणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, २00६/0७ प्रमाणे २८0 च्या दुसऱ्या हप्त्याला जसा ठेंगा दिला गेला, तसा १७५ ला ठेंगा दिला, तर काय करायचे? अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.