शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

निसर्गातील आनंदाची विलक्षण कथा म्हणजे ‘जंगल खजिन्याचा शोध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 5:34 AM

सलीम मुल्ला : साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ. प्रकाश मुंज 

कोल्हापूर : ‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी असून, बालचमूने जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही एक उत्कंठावर्धक कथा आहे. या कादंबरीत छोट्या मित्रांचे निव्वळ साहसच नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाºया मनमुराद आनंदाची ही विलक्षण कथा असल्याची प्रतिक्रिया बाल साहित्यकार सलीम सरदार मुल्ला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

मराठी भाषेतील ‘बाल साहित्य पुरस्कार’ तळंदगे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बालकादंबरीस साहित्य अकादमीतर्फे २०१९चा ‘बाल साहित्य पुरस्कार’ शुक्रवारी जाहीर झाला. पुण्यातील दर्या प्रकाशनाने २०१४ मध्ये ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली. जेबू आणि त्याचे छोटे मित्र डोंगर-कपारीतून मनसोक्त भटकतात. पशुपक्ष्यांचे आवाज, त्यांच्या पावलांचे ठसे, जलचर प्राणी, कीटक, झाडे-वनस्पती, पाना-फुलांचा गंध, त्यांचे औषधी उपयोग, दगड-मातीचे रंग व आकार अशा अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे जंगलच्या आगळ्यावेगळ्या खजिन्याची छोट्यांना ओळख होत जाते आणि यातून मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाºया टोळीचा पर्दाफाश होतो. लहान मुलांच्या दृष्टीने कादंबरी उत्कंठावर्धक आणि वाचनीय ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

सलीम मुल्ला २००६पासून कडगाव (ता. भुदरगड) येथे वनरक्षक आहेत. १९८८पासून सातत्याने वन्यप्राणी, वन्यपक्षी, निसर्गविषयक विविध पत्रिकांसह ‘लोकमत’मध्येही ते लेखन करत आहेत.निसर्गाच्या प्रत्येक अप्रूपातून हरेक ऋतूच्या नवलाईची जादू शोधता येते. पाखरांच्या कलकलाटाची लडिवाळ बोली समजून घ्यायला हवी. किडे, फुलपाखरे, पशु-पक्षी या साऱ्यांच्या हरेक हरकतींचा मागमूस घेता आला पाहिजे. तर निसर्गाच्या निर्मितीमागे ईश्वराचे नेमके प्रयोजन काय आहे, हे हळूहळू कळून येते. - सलीम मुल्ला, साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेतेदोन कांदबºया प्रकाशनाच्या मार्गावर : पेणा आणि चिकोटी व अजबाईतून उतराई या त्यांच्या दोन बालकादंबºया प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर