कोल्हापूर : कोल्हापुरात दिवसभर खडखडीत ऊन राहिले. पावसाने उघडीप दिल्याने रेंगाळलेल्या खरीप पेरण्यांना गती आली आहे.जून महिना निम्यावर गेला तरी मान्सून अद्याप सक्रिय न झाल्याने बळिराजाची चिंता वाढली आहे; तरीही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ‘वायू’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मध्यंतरी दोन दिवस चांगला पाऊस झाला.
पावसाअभावी खोळंबलेल्या खरिप पेरण्यांना दिलासादायक आहे. अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पण सकाळपासून पूर्णपणे उसंत घेतली आहे. त्यामुळे पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पावसाच्या उघडिपीमुळे जमिनीला वापसा आला असून पेरणीसाठी उपयुक्त ठरत आहे.आज हलक्या पावसाची शक्यताआज, सोमवारी ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्या, मंगळवारी मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.