लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्व दु:ख बाजूला सारून आपल्या जगण्यात कवितेतून स्त्रीने सहजपणे शब्द पेरले आहेत. जर संवेदनशून्यता आपल्या जीवनात आली तर आपण संवेदनशीलपणे जगू शकणार नाही, यामुळेच स्त्रियांनी माणूस उभा करण्यासाठी पुरेसे लेखन केलेले आहे हे मान्य करावे लागेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक कमल हर्डीकर यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कविसंमेलनात ज्येष्ठ साहित्यिक कमल हर्डीकर यांच्या हस्ते परिसरातील कवयित्रींना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक सभेच्या उपाध्यक्ष गौरी भोगले यांनी केले. सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे दमसाने प्रकाशित केलेले ग्रंथ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी झालेल्या कविसंमेलनात नीलांबरी कुलकर्णी, मंजूश्री गोखले, डॉ. प्रमिला जरग, कालिंदी कुलकर्णी, डॉ. प्रिया आमोद, सुजाता पेंडसे, डॉ. इला माटे, पूजा दिवाण, गौरी भोगले यांनी कवितांचे सादरीकरण केले. या कविसंमेलनात या कवयित्री व्यक्त झाल्या. स्वातंत्र्याचा, अत्याचाराचा, मानवतेच्या अपेक्षांचा, माणूस म्हणून जगू देण्याचा प्रश्न आहे. मनासारखे जगावे, असे वाटते, तरीही मनासारखे जगता येत नाही अशी खंत या कवयित्रींनी आपल्या कवितांमधून व्यक्त केली.
सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. नीला जोशी, सविता नाबर, खलील मोमीन, विक्रम राजवर्धन, रामहरी वरकले यांची उपस्थिती होती.
-------------------------------
फोटो : ०९०३२०२१-कोल-साहित्य सभा
फोटो ओळ : जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने आयोजित कविसंमेलनात ज्येष्ठ साहित्यिक कमल हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गौरी भोगले, डॉ. विनोद कांबळे उपस्थित हाेते.
(संदीप आडनाईक)
===Photopath===
090321\09kol_3_09032021_5.jpg
===Caption===
फोटो : ०९०३२०२१-कोल-साहित्य सभाफोटो ओळ : जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने आयोजित कविसंमेलनात ज्येष्ठ साहित्यिक कमल हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गौरी भोगले, डॉ. विनोद कांबळे उपस्थित हाेते.