लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात लोकांना मदत करण्याची भूमिका घेऊन डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रातील लोकांनी याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी केले.
सावे (ता. शाहूवाडी) येथील अशाेकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल्स सायन्सेस अँड रिसर्च कॉलेजचे प्राचार्य डाॅ. अभिजित कुलकर्णी यांना इनाेव्हेशन आर्टिस्ट वेल्फेअर असोसिएशन मुंबईच्यावतीने काेराेना याेद्धा सन्मान पुरस्कार जाहीर झाला. याबद्दल वाठार येथील संस्था कार्यालयात त्यांचा सत्कार विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने प्रमुख उपस्थित होत्या.
कोराेना काळात डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी हँड सॅनिटायझर, काेविशिल्ड, फेस मास्क, धान्य आदी साहित्यांचे वाटप काेल्हापूर शहरातील विविध दवाखाने, पाेलीस स्टेशन, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी तहसीलदार कार्यालय अशा विविध ठिकाणी करून सामाजिक बांधीलकी जपली. तसेच अर्सेनिक अल्बम ३० चे वाटप केले. याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
फोटो ओळी-अशोकराव माने इन्स्टिट्यूट येथे प्राचार्य डॉ. अभिजित कुलकर्णी यांचा सत्कार विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनीषा माने उपस्थित होत्या.