जयसिंगपूर : अत्तार संघटनेने सुरू केलेले कार्य समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. संघटनेकडून गोरगरिबांना भोजनाची मदत करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. जयसिंगपूर शहरामध्ये राज्यस्तरीय संघटनेच्या माध्यमातून फिरोज अत्तार यांनी शिरोळ तालुका अत्तार संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांना रोख स्वरुपात भीक, दान न देता शिवभोजन कूपन वितरणाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री यड्रावकर यांच्याहस्ते झाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष इरशाद अत्तार, तालुकाध्यक्ष अबिद अत्तार, रुस्तुम मुजावर यानी संघटनेच्या उपक्रमाची माहिती देऊन कोविड काळात केलेल्या कार्याची माहिती विषद केली.
याप्रसंगी सिकंदर गैबान, रमेश शिंदे, सुरेश शिंगाडे, प्रकाश शहापुरे, संजय नांदणे, भगवंत जांभळे, सावंत, जैनुद्दीन आत्तार, डॉ. रियाज अत्तार, हसन अत्तार, सिकंदर अत्तार, अजित उपाध्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - ०८०२२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अत्तार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.