कसबा बावडा : कसबा बावडा पॅव्हेलियन येथील कोविड सेंटरचे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. ते या सेंटरमधील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांच्या सत्कार समारंभ व प्रशस्तीपत्रक वाटपप्रसंगी बोलत होते.
कोरोना महामारीच्या काळात गेली पाच महिने कसबा बावडा येथील पॅव्हेलियन ग्राउंड येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या कोविड सेंटरमधून जवळपास ९२१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. ऋतुराज पाटील म्हणाले, कोरोनाच्या या संकटामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे, सामाजिक कार्यकर्ते व या सेंटरचे व्यवस्थापक गजानन बेडेकर, माजी नगरसेविका माधुरी लाड, अशोक जाधव, मोहन सालपे, सुभाष बुचडे, डॉ. मनाली मिठारी, इवाण फार्माचे झोनल मॅनेजर राहुल पोवार, विक्रांत मांजरेकर उपस्थित होते.
फोटो: १३ बावडा कोविड सेंटर
कोल्हापुरातील कसबा बावडा पॅव्हेलियन कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी आमदार ऋतुराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्त निखिल मोरे, माधुरी लाड, आदी उपस्थित होते.