कपात केलेल्या कर्जाचे हप्ते दिले परत
कोल्हापूर : महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत कर्मचारी पतसंस्थांनी एप्रिल महिन्यात कपात केलेल्या कर्जाच्या हप्त्यांची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना परत केली. सुमारे साडेतीन हजार कर्मचा-यांना कपात केलेली साठ लाखांची रक्कम त्यांना त्यांच्या खात्यावर जमा केली.
कोरोना संसर्गामुळे सध्या लॉकडाऊन असल्याने तीन महिन्यांचे हप्ते घेऊ नयेत अशा सूचना केंद्र सरकारने बॅँका, पतसंस्थांना दिल्या आहेत. तरीही महापालिकेच्या तीन कर्मचारी पतसंस्थांनी पगारातून कर्जाचे हप्ते वसूल केले होते.
महापालिकेतील कर्मचाºयांच्या आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या दोन, तर पवडी विभागातील कर्मचाºयांची एक पतसंस्था कार्यरत आहेत. केंद्र सरकारने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बॅँका, पतसंस्था तसेच अन्य वित्तीय संस्थांनी दिलेल्या कर्जाचे हप्ते पुढील तीन महिने घेऊ नयेत, असे आवाहन केले होते. यासंबंधी महापालिकेतील पतसंस्था संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून विचारणा केली होती. मात्र, त्याबाबत कोणतेही मार्गदर्शन न मिळाल्याने कर्मचाºयांच्या पगारातून कर्जाचे हप्ते व व्याज कपात झाली.
कर्मचा-यांच्या हातात जेव्हा पगार पडले तेव्हा त्यांच्या कर्जाचे हप्ते कपात झाल्याचे लक्षात आले. त्यांच्याकडून तक्रारी सुरूझाल्या. ‘लोकमत’मध्येही याबाबत वृत्त छापून पतसंस्थांच्या कारभाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार कर्मचाºयांचे कर्जाचे हप्त्यांची साठ लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी मिळालेली रक्कम पुन्हा कर्ज खात्यावर भरली.