शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात आदर्श

By admin | Published: October 13, 2016 1:39 AM

स्वाधीन क्षत्रिय : ई-जमाबंदीचा प्रयोग यशस्वी करण्याचे आवाहन; विविध समस्या सोडविण्याची ग्वाही

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे काम सर्वच पातळ््यांवर राज्यात आदर्श आहे. जिल्ह्यातील पर्यटन, विमानतळ, आरोग्य विभागांतील रिक्त पदे आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिला तसेच ई-डिस्नीक प्रणाली कोल्हापूर जिल्ह्याने यशस्वी केली असून आता यापुढे जाऊन ई-जमाबंदी प्रयोगही यशस्वी करावा, असे सांगून २६ जानेवारीपर्यंत कोल्हापूर जिल्हा १०० टक्के हागणदारीमुक्त व्हावा, यासाठी शुभेच्छा दिल्या.जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शाहू स्मारक हे ‘टुरिस्ट हब’म्हणून विकसित करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)कोल्हापूरचा गौरवकोल्हापूर जिल्ह्याने अनेक योजना सुरू केल्या आणि त्यानंतर राज्यात राबविल्या गेल्या, या भाषेत क्षत्रिय यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव केला. ई-डिस्नीक, तलाठ्यांना लॅपटॉप देण्याचा उपक्रम, स्वच्छता अभियान, आरोग्य विभागाच्या कायापालट योजनेचा त्यांनी उल्लेख केला. जिल्हा परिषदेने तसेच महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. ‘सेफ सिटी’सह अन्य विभागांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचेही कौतुक केले.जुने दस्ताऐवज सांभाळायावेळी क्षत्रिय यांनी रेकॉर्ड रूमची पाहणी करून जुन्या ब्रिटिशकालीन नोंदी अतिशय चोख असून त्या नीट सांभाळा, अशा सूचना दिल्या. जुने कागद हातात घेतले की फाटतात तेव्हा त्याचे नीट स्कॅनिंग करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. प्रांताधिकारी लकी आहेतकोणताही बडेजाव न बाळगता क्षत्रिय यांनी नवी सर्व इमारत फिरून पाहिली. दुसऱ्या मजल्यावरील करवीरचे प्रांत सचिन इथापे यांचे दालन पाहिल्यानंतर त्यांनी कुठे आहेत प्रांत, अशी विचारणा करून तुम्हाला चांगलं आॅफिस मिळालं, तुम्ही लकी आहात, अशी टिप्पणी केली. यावेळी त्यांनी इमारतीच्या दगडापासून कार्यालयातील टेबल-खुर्च्यांबाबतही सूचना केली. आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी त्यांना माहिती दिली. जिल्हा खनिकर्म अधिकारी अभय भोगे यांच्याकडून क्षत्रिय यांनी जिल्ह्यातील सर्व खनिजांची माहिती घेतली.