कोल्हापूर : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबत लवकरच चांगली बातमी मिळेल, असे सांगत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी या मार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे संकेत दिले. बुधवारी सकाळी त्यांनी येथील राजर्षी शाहू टर्मिनसची पाहणी केली; त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
येत्या पाच वर्षांत देशभरातील ब्रॉडगेजच्या सर्व मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे-मिरज या मार्गाच्या विद्युतीकरणाचे कामही सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. त्यामुळे गाड्यांची संख्या आणि वेग वाढणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे शर्मा आणि त्यांच्यासोबत आलेल्या वरिष्ठ अधिकाºयांचे कोल्हापुरी फेटे बांधून तसेच औक्षण करून स्वागत केले.
सकाळी नऊपासून शर्मा यांनी संपूर्ण स्थानकाची पाहणी केली. यावेळी चालू असलेल्या कामाची माहिती घेत, ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. यावेळी अरुंधती महाडिक यांच्या हस्ते व्ही. आय. पी. कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत पुणे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, पुणे मंडल वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील यांच्यासह पुणे विभागाच्या सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी अरुंधती महाडिक यांनी ‘ग्रीन व्हिजन’ संस्थेतर्फे रेल्वेस्थानक अधिकाधिक सुंदर करणार असल्याचे सांगितले. शर्मा यांनी येथील चित्रे पाहून चित्रकारांचे कौतुक केले. काही दिवसांपूर्र्वी रेल्वेच्या ए. सी. कोचमध्ये मृत उंदीर सापडला होता. याबाबत एका प्रवाशाने तक्रार केली होती. या प्रकाराची दखल घेत शर्मा यांनी संबंधित अधिकाºयांची कानउघाडणी केली. रेल्वेत प्रवास करणाºया महिलांच्या सुरक्षेबद्दल महाव्यवस्थापक शर्मा यांना महिला प्रवासी संघटनेच्या वंदना सोनवणे यांनी निवेदन दिले. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलमध्ये गर्दुले, भिकारी व मद्यप्यांचा वावर मोठा आहे. त्यांच्याकडून महिला प्रवाशांवर हल्ले व त्यांची छेडछाड होते. रेल्वे पोलिसांकडून काही वेळा त्यांच्यावर जुजबी कारवाई केली जाते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गडमुडश्ािंगी-गांधीनगर भुयारी मार्ग करागडमुडशिंगी आणि गांधीनगर या मार्गावरून दररोज चार ते पाच हजार लोक ये-जा करीत असतात. १० ते १२ गावांतील लोकांच्या सोयीसाठी लोहिया कंपाउंडजवळ भुयार बांधले जावे, अशी मागणी करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे यांनी केली. यावेळी दिलीप थोरात, पिंटू सोनुले, मीरासाब कोलप, गुंडा वायदंडे, बच्चू घाडगे, शिवतेज झांबरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.गांधीनगरला गाड्या थांबवागांधीनगरच्या शिष्टमंडळने शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गांधीनगर येथे प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे सर्व गाड्या थांबाव्यात. स्थानकावरील स्वच्छतागृहे बंद आहेत. एखादी गाडी उशिरा सुटणार असेल तर त्याची माहिती उपलब्ध होत नाही. निवारा शेड अपुरी असल्याने ती वाढविणे गरजेचे असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. यामध्ये रमेश तनवाणी, नानक उर्फ बंडू सुंदराणी, महिला मंदिर कार्यकर्त्या पोपरी केसवाणी, गुल बद्रेल, चंद्रलाल वासवाणी, आदींचा समावेश होता.कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी अरुंधती महाडिक यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मिलिंंद देऊस्कर, कृष्णात पाटील, विजय कुमार, शिवनाथ बियाणी, मोहन शेटे, समीर शेठ उपस्थित होते.