कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचा अखेरच्या स्लँबचे काँक्रीट टाकण्याचे काम सुरू झाले. कोल्हापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी, महिलांनी पारंपारिक पध्दतीने वाजत गाजत गारवा आणून आणखीन शोभा वाढवली.पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले.
ग्रामस्थांनीही वाजत गाजत गारवा आणून आणखीन शोभा वाढवली. गेली पाच वर्ष तांत्रिक कारणामुळे पुलाचे काम बंद होते. आज अखेरच्या टप्प्यातील काम असल्यामुळे परिसरातील वडणगे आंबेवाडी, प्रयाग चिखली, वरणगे आदी परीसरात महिलांनी, ग्रामस्थांना मोठ्या उत्साहाने येथे अंबील-घुगऱ्या यांचा नैवेद्य आणला.
आज पर्यंत आंदोलनात सक्रिय असलेल्या कोल्हापुरातील क्रुती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर के पोवार यांच्यासह कार्यकर्ते ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य येथे उपस्थित होते.महापौर सरीता मोरे, बाबा पार्टे, स्वप्नील पार्टे, अशोक भंडारे, वैशाली महाडिक, चिखलीच्या ग्रामपंचायत सदस्य जयश्री दळवी, नंदा बोराटे, किशोर घाडगे, दीपाताई पाटील, माई वाडेकर, अशोक पवार, रमेश मोरे, महादेव पाटील, लाला गायकवाड, भीमराव आडके, नंदकुमार मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, वडणगे सरपंच सचिन चौगुले, चिखली सरपंच उमा पाटील, उपसरपंच भुषण पाटील आंबेवाडी सरपंच सिकंदर मुजावर, फिरोज खान उस्ताद यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.कॉन्ट्रॅक्टर एन. डी. लाड, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता अशोक भोसले, शाखा अभियंता यशवंत खोत, अनिल पाटील यांनी काँक्रीट कामाची पाहणी केली.