कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलातर्फे छेडछाडविरोधी निर्माण केलेल्या ‘निर्भया’ पथकाचे काम मंगळवारपासून सुरू झाले. प्रथम छेडछाडीची ठिकाणे निश्चित करणे, पोलिसांना प्रशिक्षण देणे व येणाऱ्या तक्रारींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात ‘निर्भया’ पथकाचे काम सुरू होणार असल्याची माहिती महिला साहाय्य कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर यांनी मंगळवारी दिली.सोमवारी (दि. ८) पोलिस दलातर्फे महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘निर्भया पोलिस पथका’चा प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. जिल्ह्यात दहा निर्भया पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील चार पोलिस ठाणी, इचलकरंजी (शहर, ग्रामीण), जयसिंगपूर, शाहूवाडी, गडहिंग्लज, कागल यांचा समावेश आहे. या पथकात एक पोलिस उपनिरीक्षक, दोन महिला कर्मचारी, तीन पुरुष कर्मचारी, एक चालक असे सदस्य असणार आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालये, कॉलेज, शाळा, नोकरी, आस्थापना, चौक, टपरी, गर्दीची ठिकाणी येथे ते टेहळणी करणार आहे. यासाठी पथकाकडे छुपे कॅमेरे असणार आहेत. छेडछाड करणाऱ्यास प्रथम ताब्यात घेऊन त्याची विहित नमुन्यात माहिती व छायाचित्र घेतले जाणार आहे. मुलगा अज्ञान असेल तर त्याच्या आई-वडिलांना बोलावून समुपदेशन, प्रबोधन केले जाणार आहे. तरुण असेल तर त्याला पालकांसमोर बोलावून प्रथम प्रबोधन केले जाणार आहे. दुसऱ्यांदा दंडुक्याचा वापर केला जाणार आहे. विवाहित तरुण असेल तर त्याच्या पत्नीला पोलिस ठाण्याला बोलावून त्याचे कृत्य सांगितले जाणार आहे. याशिवाय पत्नीसमोरच समुपदेशन केले जाणार आहे. स्वत: यात पोलिस गुन्हे दाखल करणार आहेत. याठिकाणी करा संपर्क४पथकाशी संपर्कासाठी व्हॉट्स अॅप क्रमांक ९५५२३२८३८३, ७२१८०३८५८५ईमेल आयडी - ू१.‘ङ्मस्र@ेंँंस्रङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्लटिष्ट्वटर आयडी -ँ३३स्र:/३६्र३३ी१.ूङ्मे/ल्ल्र१ुँं८ं_३ीेंफेसबुक आयडी -६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ल्ल्र१ुँं८ं ३ीें‘ङ्म’ँंस्र४१संपर्क नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३
‘निर्भया’चे काम सुरू
By admin | Published: August 10, 2016 12:33 AM