कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक वर्षे झाली तरी रखडलेल्या १७ पाणी योजनांपैकी १0 योजना आता मार्गी लागल्या आहेत. २ डिसेंबरला ‘लोकमत’ने याचे सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कडक भूमिका घेत यातील दहा योजना मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. मार्चअखेरीपर्यंत या योजनांची कामे पूर्ण होणार आहेत.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावोगावी गेल्या अनेक वर्षांमध्ये पाणी योजना करण्यात आल्या. एक योजना तयार करून त्याची मंंजुरी घेण्यासाठी दोन, दोन वर्षांचा कालावधी जातो. त्याला निधीचीही प्रतिक्षा करावी लागते. मात्र या ठिकाणी निधी असूनही योजना अडचणीत आल्या आहेत. २0११ पासून यातील काही योजना सुरू असून स्थानिक वाद, जागांची अडचण, न्यायालयीन बाब यामुळे सव्वा तेरी कोटी रूपयांच्या या योजना अडचणीत आल्या आहेत. भुदरगड तालुक्यातील डेळेपैकी चिवळे येथे २0१४/१५ मध्ये योजना मंजूर झाली होती.