कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले. पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना झालेल्या कामाच्या बिलात अधिकाऱ्यांनी महिन्यात चारवेळा फेरफार केले. परिणामी पदरी एक रुपयाही परतावा न मिळाल्याने संतप्त ठेकेदाराने पुलाचे काम आज, सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुलाचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावार आला आहे.ठेकेदाराने पुलासाठी दीड कोटी रुपये खर्च केला असतानाही आता त्यांच्या हाती रुपयाही पडलेला नाही. कामावर उपअभियंता संपत आबदार हे क्षेत्रिय प्रबंधक आहेत. नवीन रस्ता, भराव, कॉलमचा पाया न लागल्याने वाढलेली खुदाई, पुलाचे बदललेले डिझाईन आदी कामे निविदेपेक्षा वाढली, पण नेहमी देखरेखीत असणारे उपअभियंता आबदार यांनी वाढीव कामांचे बिल काढण्यास नकार दिल्याने वाद उफाळला. तो मुंबईतील मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्या समोरही गेला. तेथेही वाढीव कामांचे बिल देण्याचा निर्णय झाला, तरीही वाद प्रलंबित राहिला.चारवेळा बिलाच्या रकमेत फेरफारउपअभियंता आबदार यांनी कामांचे मोजमाप केले, पण त्यांनी वाढीव कामाचे मोजमापाचे बिल धरण्यास नकार दिला. त्यामुळे कामांचे पहिल्यांदा ६५ लाख, दुसºयांदा ९० लाख, तिसºयांदा फक्त ९ लाख रुपये बिल काढले.तर शनिवारी पुन्हा फेरफार करून तेच बिल ५३ लाख रुपये मंजुरीसाठी पाठवले. ते कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी नाकारले. एकाचवेळी झालेल्या कामांचे चारवेळा बिल कसे निघते? याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.तर काम थांबवले का नाही?क्षेत्रिय प्रबंधक म्हणून संपत आबदार हे असताना ते कामांची तपासणी करीत होते. निविदेबाहेरील काम वाढले, त्यावेळी त्यांनी ते बेकायदेशीर असेल तर थांबविले का नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.लोकप्रतिनिधी गायबपुलाला मंजुरी आणली म्हणून फलक लावून श्रेय घेणारे लोकप्रतिनिधी पुन्हा पुलाच्या कामाकडे फिरकलेच नाहीत. त्यांनी साधी चौकशीहीकेलेली नाही.
शिवाजी पुलाचे काम पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:28 AM