कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम आज, सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय रविवारी रात्री प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ठेकेदारांनी काम करण्याची तयारी दर्शविल्याने काम सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक संजय मोहिते यांच्या पुढाकाराने प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रकआर. के. पोवार, बाबा पार्टे, अशोकपोवार, रमेश मोरे, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, ठेकेदार बापू लाड, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, आदी उपस्थित होते.कृती समितीने उद्या, मंगळवारपासून बंद पुलावर ‘भिंत बॉँधो’ आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर समितीकडूनजोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांंनी रविवारीरात्री बैठक घेतली. या बैठकीत महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार बापू लाड यांनी काम करण्यास सहमती दर्शविल्याने आज, सोमवारपासून पर्यायी शिवाजी पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे; परंतु कोल्हापूरच्या बाजूकडील रखडलेल्या कामाबाबतचा गुंता अद्याप कायम राहिला आहे.कायद्याच्या चौकटीत राहून शिवाजी पुलाचे काम सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर शहराच्या बाजूकडून कामास सुरुवात होईल. पुरातत्त्व व आपत्कालीन या विषयावर नंतर बोलू.- संजय मोहिते, पोलीस अधीक्षकपर्यायी शिवाजी पुलाच्या कामाला आज, सोमवारपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर उर्वरित कामांबाबत आपत्कालीन व पुरातत्त्व विभागांच्या पातळीवरील पाठपुरावा सुरूच राहणार आहे.- नंदकुमार काटकर,प्रभारी जिल्हाधिकारीपुलाचे काम सुरू करण्याबाबत पोलीस अधीक्षक, प्रभारी जिल्हाधिकारी व ठेकेदारांनी सांगितले आहे. आज, सोमवारी दुपारी अडीच वाजता प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत या संदर्भात बैठक होणार आहे. नुसती शोबाजी झाली तर ठेकेदार व पोलीस अधीक्षकांच्या घरांवर मोर्चे काढू.-आर. के. पोवार, निमंत्रक, सर्वपक्षीय कृती समिती
शिवाजी पुलाचे काम आजपासून होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:47 AM